---Advertisement---

‘या’ दोन युवा भारतीय क्रिकेटर्सचा फॅन झाला ब्रेट ली; म्हणाला…

---Advertisement---

नवी दिल्ली | इंडियन प्रीमियर लीगचा 13 वा हंगाम मंगळवारी (10 नोव्हेंबर) संपन्न झाला. अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्लीला पराभूत करून आयपीएल इतिहासात 5 व्या वेळी विजेतेपद जिंकले. या काळात बऱ्याच युवा भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली आणि सर्वांना आपल्या कौशल्याने प्रभावित केले. या युवा खेळाडूंच्या कामगिरीने प्रभावित झालेल्या दिग्गजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याचेही नाव आहे. ब्रेट ली याने आयपीएलचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल कौतुक केले आणि या हंगामातील दोन सर्वात प्रभावी खेळाडूंची नावेही सांगितली.

देवदत्त पडिक्कल आणि राहुल तेवतिया यांनी केले प्रभावित
स्टार स्पोर्ट्स चॅनेलवरील ‘क्रिकेट लाइव्ह’ या शोमध्ये बोलताना ब्रेट ली म्हणाला की, “आयपीएलच्या 13 व्या हंगामात युवा भारतीय खेळाडूंचे वर्चस्व पाहायला मिळाले. त्यापैकी आरसीबीचा सलामीवीर देवदत्त पडिक्कल आणि राजस्थानचा अष्टपैलू राहुले तेवतिया हे माझे आवडते खेळाडू आहेत. त्यानी त्यांच्या कामगिरीने सर्वाधिक प्रभावित केले आहे.”

देवदत्त पडिक्कल याला मिळाला “इमर्जिंग प्लेअर ऑफ द इयर” पुरस्कार
आयपीएलचा पहिला हंगाम खेळणारा आरसीबीचा सलामीवीर देवदत्त पडिक्कल याला इमर्जिंग प्लेअर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या हंगामात देवदत्त पडिक्कलने आरसीबीकडून 15 सामन्यांत 5 अर्धशतकांसह सर्वाधिक 473 धावा केल्या आहेत.

राहुल तेवतियाने केली उत्कृष्ट कामगिरी
त्याचबरोबर राजस्थान रॉयल्सकडून खेळताना राहुल तेवतियाने 14 सामन्यात 255 धावा केल्या आणि 10 गडीही बाद केले आहे. त्याने त्याच्या संघासाठी अष्टपैलू कामगिरी बजावली आहे. इतकेच नाही, तर त्याने स्वत: च्या बळावर राजस्थानला विजयही मिळवून दिला आहे.

भारतीय युवा खेळाडूंनी स्वतःच्या बळावर सामन्याचे चित्र बदलले – ब्रेट ली
ब्रेट ली याने खेळाडूंचे कौतुक करताना म्हटले आहे की, “आयपीएलच्या या हंगामातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आम्हाला यंदा अशा भारतीय युवा खेळाडूंना पाहायला मिळाले ज्यांनी स्वत:च्या बळावर सामन्याचे चित्र बदलण्याचे काम केले. त्यानी या स्पर्धेला असाधारण बनवलं. प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत खेळणे अवघड आहे. परंतु या खेळाडूंनी त्यांच्या कामगिरीने घरात बसून सामना पाहात असलेल्या चाहत्यांचे मनोरंजन केले. देवदत्त आणि राहुल तेवतिया यांनी शानदार प्रदर्शन केले. दिल्ली कॅपिटल्स संघानेही चांगला खेळ केला.”

‘गेलने पुनरागमन केले’ हा आवडता क्षण
आयपीएल 2020 मध्ये आक्रमक फलंदाज ख्रिस गेलने किंग्ज इलेव्हन पंजाबकडून मैदानात पुनरागमन केले. ब्रेट ली याने हा त्याचा आवडता क्षण होता असे म्हटले आहे. त्याचा असा विश्वास आहे की गेलने आणि पंजाब संघाने ज्या प्रकारे पुनरागमन केले ते पाहणे आश्चर्यकारक होते.

महत्त्वाच्या बातम्या –

कसोटीत ११ देशांत शतक करणारा जगातील एकमेव क्रिकेटर झाला पाकिस्तानचा फलंदाजी प्रशिक्षक

भारताविरुद्ध होणाऱ्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा

एकाच दिवशी तीन सुपर ओव्हर! आयपीएल २०२०च्या १० अशा गोष्टी, ज्या विसरणं आहे महाकठीण

ट्रेंडिंग लेख –

ज्याच्या गोलंदाजीवर जखमी होत फिलीप ह्युजेस देवाघरी गेला, तोच गोलंदाज भारताविरुद्ध करतोय पदार्पण

मिशन डॉट बॉल! रशिद, बोल्ट सर्वाधिक डॉट बॉल फेकणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत; ‘हा’ गोलंदाज अव्वल स्थानावर

आयपीएल २०२०मधील ५ खेळाडू; ज्यांनी सिंहाचा वाटा उचलत गाजवले मैदान

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---