कसोटी सामन्यात एका डावात सर्वाधिक धावा काढण्याचा जागतिक विक्रम वेस्ट इंडिजचे महान क्रिकेटर ब्रायन लाराच्या नावे आहे. कसोटी सामन्यात ब्रायन लारा हा असा क्रिकेटर आहे ज्याच्या नावे एका डावात सर्वाधिक 400 धावा केल्या आहेत. या दिग्गज क्रिकेटरने या 4 खेळाडूंचे नाव घेतले आहे जे भविष्यात लारा यांचा हा विश्वविक्रम मोडून काढतील. लाराने 2004 मध्ये घरच्या मैदानावर इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात सेंट जोन्स या मैदानावर या विक्रम रचला होता.
वास्तविक, हा सामना ड्राॅ झाला होता. या सामन्यात ब्रायन लारा 400 नाबाद धावा करुन परतले होते. यावेळी वेस्ट इंडिजने पहिल्या डावात 5 विकेट गमावून 751 धावा करुन डाव घोषित केले होते. त्यावेळी ब्रायन लारा 400 धावांवर नाबाद होते. लारा 400 धावा करण्यासाठी 582 चेंडूंचा सामना केला होता. ज्यमध्ये 43 चाैकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. लारांच्या या विश्वविक्रमाजवळ आता पर्यंत फक्त श्रीलंकेचा माजी कर्णधार माहेला जर्यवर्धने पोहचला आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 374 धावा केल्या होत्या.
डेली मेलशी बोलताना ब्रायन लारांना, तुमचा 400 धावांचा विक्रम कोण मोडणार असे विचारले असता, उत्तर देताना लारा म्हणाले, भविष्यात हा विक्रम शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, हॅरी ब्रुक आणि जॅक क्राउली हे चार फलंदाज आहेत हे विक्रम मोडू शकतात. लारांनी रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे नाव घेतले नाही.
लारा क्रिकेट इतिहासातील महान क्रिकेटर पैकी एक आहेत. त्यांनी 131 कसोटी आणि 299 एकदिवसीय सामने खेळले आहेत. लारांच्या नावे कसोटीत 11953 तर वनडे मध्ये 10405 धावा आहेत. तर या महान क्रिकेटरने कसोटी सामन्यात 34 तर एकदिवसीय सामन्यात 19 शतके ठोकल्या आहेत.
महत्तवाच्या बातम्या-
जिद्द असेल तर काहीच अशक्य नाही! वयाच्या 58व्या वर्षी ऑलिम्पिक पदार्पण करणार ही महिला खेळाडू
आता केकेआरच्या या 4 खेळाडूंची चांदी, गाैतम गंभीरच्या प्लॅनमध्ये होणार सामिल?
3 खेळाडू जे भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक बनू शकतात, गंभीरनं सुचवलं या विदेशी खेळाडूचं नाव