सध्या देशात आयपीएल 2024 ची धूम आहे. यानंतर टी20 विश्वचषकाला सुरुवात होईल. या संदर्भात दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लारा यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. लारांच्या म्हणण्यानुसार, स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव यानं वरच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी यावं. त्याचबरोबर त्यांनी भारत विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश करेल, अशी आशाही व्यक्त केली आहे.
ब्रायन लारा म्हणाले, “माझा सल्ला आहे की सूर्यकुमार यादवनं तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करावी. तो टी20 क्रिकेटमधील महान फलंदाजांपैकी एक आहे. तुम्ही जर सर व्हिव्ह रिचर्ड्ससारख्या खेळाडूंना विचाराल तर ते तुम्हाला सांगतील की त्यांच्यात मधल्या फळीत फलंदाजीसाठी किती उत्साह असायचा. मला सूर्यकुमारमध्येही तेच गुण दिसतात. सूर्यानं जर 10-15 षटकं फलंदाजी केली, तर तो संघाला विजय मिळवून देऊ शकतो.”
सूर्यकुमार यादव सहसा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. आतापर्यंत भारताकडून चौथ्या क्रमांकावर खेळताना त्यानं 50 पेक्षा जास्त सरासरीनं 1402 धावा केल्या आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्यानं 14 डावात 479 धावा केल्या आहेत.
टी20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीबाबत भाकीत करताना ब्रायन लारा म्हणाले की, “वेस्ट इंडीजनं विश्वचषकात चांगली कामगिरी करावी, कारण संघात अनेक मोठे खेळाडू आहेत. भारतीय संघाच्या निवडीबाबत कितीही कुरबुरी सुरू असल्या तरी भारतीय संघ टॉप 4 मध्ये निश्चित जाईल. त्याशिवाय इंग्लंडला कॅरेबियन खेळपट्यांवर खेळायला आवडतं. माझ्या मते अफगाणिस्तात टॉप 4 मध्ये जाण्याची क्षमता आहे. भारत आणि वेस्ट इंडिज अंतिम फेरीत एकमेकांसमोर असतील. मला खात्री आहे की, यांच्यापैकी सर्वोत्तम संघ जिंकेल.”
टी20 विश्वचषकासाठी भारतीय टीम – रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
राखीव खेळाडू : शुबमन गिल, रिंकू सिंह, खलिल अहमद, आवेश खान
टी20 विश्वचषक 2024 साठी भारतीय संघाचं वेळापत्रक
5 जून 2024 – भारत विरुद्ध आयर्लंड, न्यूयॉर्क
9 जून 2024 – भारत विरुद्ध पाकिस्तान. न्यूयॉर्क
12 जून 2024 – भारत विरुद्ध यूएसए, न्यूयॉर्क
15 जून 2024 – भारत विरुद्ध कॅनडा, फ्लोरिडा
महत्त्वाच्या बातम्या –
संजू सॅमसनच्या वादग्रस्त झेलवर आक्रमकपणे सेलिब्रेशन करणारे पार्थ जिंदाल कोण आहेत? जाणून घ्या
सरावादरम्यान विराट कोहलीची चाहत्यांसोबत मस्ती, हा व्हिडिओ नाही पाहिला तर काय पाहिलं?
अमेरिका-वेस्ट इंडिजमध्ये खेळला जाणारा टी20 विश्वचषक भारतात विनामूल्य कसा पाहता येणार? जाणून घ्या