---Advertisement---

सरावादरम्यान विराट कोहलीची चाहत्यांसोबत मस्ती, हा व्हिडिओ नाही पाहिला तर काय पाहिलं?

---Advertisement---

आयपीएल 2024 चा 58 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात खेळला जाणार आहे. गुरुवार, 9 मे रोजी धर्मशालाच्या सुंदर मैदानावर हे दोन संघ आमनेसामने येतील. या दोन्ही संघांसाठी हा ‘करो किंवा मरो’ सामना आहे.

या सामन्यापूर्वी बेंगळुरूच्या खेळाडूंनी धर्मशालामध्ये जोरदार सराव केला. सरावादरम्यान आरसीबीचा स्टार खेळाडू विराट कोहली खूप मस्ती करताना दिसला. विराट कोहलीचा सरावादरम्यानचा एक मनोरंजक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये तो पंजाबी भाषेत काहीतरी बोलताना दिसत आहे. कोहलीचं बोलणं ऐकून तिथे उपस्थित असलेले चाहते हसायला लागतात.

या व्हिडिओमध्ये विराट कोहलीच्या आजूबाजूला काही लोक उभे असल्याचं दिसत आहे. दरम्यान, एक चाहता विराट कोहलीला ऑटोग्राफ मागतो. ऑटोग्राफ देताना कोहली पंजाबीत काहीतरी बोलतो आणि सगळे हसायला लागतात. कोहलीच्या या व्हायरल व्हिडिओवर चाहत्यांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. लोक त्याच्या वागण्याचं खूप कौतुक करत आहेत.

एका यूजरनं लिहिलं की, “विराट कोहलीच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहण्यासारखं आहे. सरावाच्या वेळी त्यानं चाहत्यांना ऑटोग्राफ दिले. हा चाहत्यांसाठी एक जादुई क्षण आहे.” आणखी एका यूजरनं लिहिलं, “विराट कोहलीचं हास्य पाहून खूप आनंद झाला. त्या भाग्यवान चाहत्याला कोहलीचा ऑटोग्राफ मिळाला, जो अमूल्य आहे.”

 

आयपीएलच्या चालू हंगामात विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तो सध्या आयपीएल 2024 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. विराटनं आतापर्यंत खेळलेल्या 11 सामन्यांमध्ये 67.75 ची सरासरी आणि 148.08 च्या स्ट्राईक रेटनं 542 धावा ठोकल्या आहेत. या दरम्यानं त्यान 1 शतक आणि 4 अर्धशतकंही झळकावली आहेत.

एकीकडे विराट कोहली जरी तुफान फार्मात असला, तरी आरसीबीची या हंगामातील कामगिरी फारशी चांगली राहिलेली नाही. संघानं 11 पैकी 4 सामने जिंकले असून 7 सामन्यांमध्ये पराभव पत्कारला आहे. आरसीबी गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. आरसीबीला प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी शेवटचे तीन सामने जिंकणे आवश्यक आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

टी२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय, युजवेंद्र चहलच्या नावे आणखी एक विक्रम

आयपीएल 2024 मध्ये अप्रतिम कामगिरी करणारे 4 अनकॅप्ड भारतीय वेगवान गोलंदाज, लवकरच टीम इंडियामध्ये मिळू शकते जागा

पॅट कमिन्सचा आवडता भारतीय क्रिकेटपटू कोण? ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारानं दिलं अनपेक्षित उत्तर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---