---Advertisement---

इंग्लंडचे खेळाडू आयपीएलच्या प्लेऑफमध्ये खेळतील की नाही? जाणून घ्या BCCI आणि ECB मध्ये काय चर्चा झाली

---Advertisement---

राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन संघ आयपीएलच्या प्लेऑफमध्ये खेळतील, हे आता जवळपास निश्चित आहे. मात्र प्लेऑफमध्ये राजस्थानचा जोस बटलर आणि कोलकाताचा फिल सॉल्ट खेळताना दिसतील की नाही, हा मोठा प्रश्न आहे.

वास्तविक, आयपीएलच्या प्लेऑफमध्ये इंग्लंडच्या खेळाडूंच्या खेळण्यावर सस्पेंस आहे. यासंबंधीची मोठी बातमी नुकतीच समोर आली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयनं इंग्लंड क्रिकेट बोर्डाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र काहीच निष्पन्न झालं नाही. त्यामुळे आयपीएलच्या प्लेऑफमध्ये इंग्लंडचे खेळाडू खेळणार नाहीत असंच दिसतंय.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या या भूमिकेवर आयपीएलचे संघ खूश नाहीत. टी20 विश्वचषकापूर्वी इंग्लंड क्रिकेट संघ पाकिस्तानविरुद्ध टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी आयपीएलमध्ये खेळणाऱ्या इंग्लंडच्या क्रिकेटपटूंना स्पर्धा मध्येच सोडावी लागेल. विशेषत: राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट रायडर्ससाठी हा मोठा धक्का मानला जाऊ शकतो. राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलर सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. तसेच कोलकाता नाईट रायडर्सचा फलंदाज फिल सॉल्टही खोऱ्यानं धावा गोळा करतोय. त्यामुळे या संघांना प्लेऑफपूर्वी मोठा धक्का बसेल यात शंका नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयनं इंग्लंड क्रिकेट बोर्डाची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु काही निष्पन्न झालं नाही. त्यामुळे आता बीसीसीआयनं हार मानली आहे. इंग्लंडचे खेळाडू आयपीएलच्या प्लेऑफमध्ये खेळणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंग्लंडचे खेळाडू टी-20 विश्वचषकापूर्वी पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेचा भाग असतील. यानंतर, जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंड क्रिकेट टीम विश्वचषकासाठी वेस्ट इंडिजला रवाना होईल.

2024 टी20 विश्वचषकासाठी इंग्लंडचा संघ – जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम करन, बेन डकेट, टॉम हार्टले, विल जॅक्स, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, फिल सॉल्ट, रीस टॉपली, मार्क वुड

टी-20 विश्वचषकात इंग्लंडचा पहिला सामना स्कॉटलंडशी होणार आहे. हा सामना 4 जून रोजी खेळला जाईल. इंग्लंडचा संघ 31 मे रोजी बार्बाडोसला रवाना होणार आहे. इंग्लंडचा दुसरा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहे. हा सामना 8 जून रोजी खेळला जाईल. 13 जून रोजी इंग्लंड आणि ओमान यांच्यात सामना होणार आहे. यानंतर त्यांचा सामना नामिबियाशी होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

ड्रेसिंग रुममध्ये इतका निराश का दिसत होता रोहित? व्हायरल VIDEO पाहून चाहतेही भावूक

आयपीएलमध्ये फाटलेल्या स्नायूंनी खेळतोय महेंद्रसिंह धोनी! डॉक्टरांनी दिल्या विश्रांतीच्या सक्त सूचना

सूर्यकुमार यादवचं शतक, प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या मुंबईनं केला हैदराबादचा खेळ खराब

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---