IPLक्रिकेटटॉप बातम्या

केकेआरच्या खेळाडूंना आलं महादेवाचं बोलावणं, विमान कोलकात्याला जाण्याऐवजी वाराणसीला पोहचलं!

रविवारी लखनऊ सुपर जायंट्सचा 98 धावांनी पराभव केल्यानंतर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाताचा संघ सोमवारी संध्याकाळी कोलकात्याला रवाना झाला. संध्याकाळी 7.25 वाजता टीम कोलकात्याला पोहोचणार होती. परंतु लखनऊहून कोलकात्याला जाणारं विमान खराब हवामानामुळे उतरू शकलं नाही. विमान कोलकात्यात उतरणं अशक्य होतं, त्यामुळे चार्टर्ड फ्लाइट आधी गुवाहाटी आणि त्यानंतर वाराणसीकडे वळवण्यात आली. अशाप्रकारे संपूर्ण टीमला वाराणसीमध्ये एक रात्र काढावी लागली.

केकेआरच्या मीडिया टीमनं सोमवारी रात्री 9.45 वाजता माहिती दिली की, कोलकातामधील खराब हवामानामुळे टीमची चार्टर्ड फ्लाइट गुवाहाटीकडे वळवण्यात आली होती. तासाभरानंतर कोलकात्याकडे उड्डाणासाठी ग्रीन सिग्नल देण्यात आले. परंतु पुन्हा हवामान अनुकूल नसल्यामुळे ती वाराणसीच्या दिशेनं वळवण्यात आली.

संघानं रात्री 1:15 वाजता जारी केलेल्या अपडेटमध्ये म्हटलं आहे की, ‘फ्लाइट गुवाहाटीहून कोलकाता येथे जाणार होती, परंतु खराब हवामानामुळे रात्री 11 वाजता उतरू शकली नाही. खराब हवामानामुळे उतरण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले आणि ते वाराणसीच्या दिशेने गेले. ते येथे आत्ताच उतरले आहेत.

मंगळवारी पहाटे संपूर्ण टीमनं वाराणसी येथील बाबा विश्वनाथ मंदिराचं भव्य दर्शन घेतलं. यावेळी खेळाडूंनी पवित्र गंगा नदीत नौकानयन केलं आणि घाटांवर फेरफटका मारला.

 

 

 

कोलकाता नाईट रायडर्सचा पुढील सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे. हा सामना 11 मे रोजी ईडन गार्डन्सवर खेळला जाईल. आयपीएल 2024 च्या पॉइंट टेबलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स सध्या अव्वल स्थानावर आहे. संघानं आतापर्यंत 11 सामने खेळले, ज्यापैकी 8 सामने जिंकले असून 3 सामन्यांमध्ये पराभव पत्कारावा लागला आहे. कोलकाता नाईट रायडर्सचे सध्या 16 गुण आहेत. आणखी एक विजय मिळवताच कोलकाताचा प्लेऑफमधील प्रवेश निश्चित होईल.

महत्त्वाच्या बातम्या – 

निवृत्तीनंतर भारतात स्थायिक होणार का? डेव्हिड वॉर्नर म्हणाला, “मी इथे घर…”

इंग्लंडचे खेळाडू आयपीएलच्या प्लेऑफमध्ये खेळतील की नाही? जाणून घ्या BCCI आणि ECB मध्ये काय चर्चा झाली

ड्रेसिंग रुममध्ये इतका निराश का दिसत होता रोहित? व्हायरल VIDEO पाहून चाहतेही भावूक

Related Articles