---Advertisement---

माजी दिग्गजाचा भारताच्या युवा खेळाडूला सल्ला! म्हणाला, “त्याला ऑस्ट्रेलियाविरूद्ध…”

On: मंगळवार, ऑक्टोबर 8, 2024 9:45 PM
Yashasvi Jaiswal
---Advertisement---

भारत विरूद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघात नुकतीच 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली आहे. या मालिकेत भारताने 2-0 ने बांगलादेशचा धुव्वा उडवला. बांगलादेविरूद्ध खेळल्या गेलेल्या दोन्ही सामन्यात भारताचा स्टार युवा फलंदाज यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) चमकदार कामगिरी केली. दुसऱ्या सामन्यात त्याला सामनावीर पुरस्कार देखील देण्यात आला होता. तत्पूर्वी वेस्ट इंडिजच्या माजी दिग्गज खेळाडूने जयस्वालला मोठा सल्ला दिला आहे.

आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग दरम्यान ब्रायन लाराने (Brian Lara) मीडियाशी बोलताना सांगितले की, “जयस्वालकडे कोणत्याही परिस्थितीत खेळण्याची क्षमता आहे, मी त्याला वेस्ट इंडिजमध्ये पाहिले आहे. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या वेगळ्या असतील पण तुमच्यात अशी क्षमता असेल तर तुम्ही प्रत्येक परिस्थितीत चांगले खेळू शकता, मला आशा आहे की तो चांगला खेळेल.”

पुढे बोलताना लारा म्हणाला, “ऑस्ट्रेलियात यशस्वी होण्यासाठी जयस्वालला काही मानसिक तडजोड करावी लागेल. म्हणजे तुम्हाला स्वतःमध्ये आत्मविश्वास असायला हवा की, तुम्ही प्रत्येक परिस्थितीत चांगले खेळू शकता, तथापि, भारतात आता परिस्थिती बदलली आहे, अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू आयपीएलमध्ये येत आहेत, तुमच्या खेळाडूंमध्ये विविध प्रकारचे कौशल्य आहे. स्पर्धा आहे जी चांगली गोष्ट आहे, त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या फार काही करण्याची गरज आहे असे मला वाटत नाही.”

महत्त्वाच्या बातम्या-

अजिंक्य रहाणेच्या मुंबई संघावर पैशांचा पाऊस, 27 वर्षांचा दुष्काळ संपवल्याचं बक्षीस मिळालं
ind vs ban; दुसऱ्या टी20 साठी भारताची संभाव्य प्लेइंग 11, या खेळाडूचा होणार पत्ता कट?
Vinesh Phogat; पहिल्याच निवडणुकीत विनेश फोगट यशस्वी, भाजपाच्या उमेदावाराचा पराभव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---