ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नरने काही दिवसांपूर्वी ऍडलेड येथे झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात नाबाद 335 धावांची खेळी केली. त्यावेळी त्याला वेस्ट इंडिजचे दिग्गद फलंदाज ब्रायन लारा यांच्या 400 धावांच्या सर्वोच्च खेळीचा विक्रम मोडण्याची संधी होती.
मात्र त्या सामन्यात वॉर्नर 335 धावांवर खेळत असताना ऑस्ट्रेलियाने त्यांचा पहिला डाव घोषित केला. त्यामुळे वॉर्नरला ही संधी गमवावी लागली. याबद्दल लारा यांनीही नाराजी व्यक्त केली होती. तसेच त्यानंतर वॉर्नरनेही लारा यांचा विक्रम मोडण्याची पुन्हा एकदा संधी मिळेल अशी आशा व्यक्त केली.
पण आता जेव्हा एका वृत्तसंस्थेच्या मुलाखतीत लारा यांना विचारण्यात आले की दोन असे कोणते भारतीय खेळाडू आहेत जे त्यांचा विक्रम मोडू शकतील, तेव्हा लारा यांनी रोहित शर्मा आण पृथ्वी शॉ यांचे नाव घेतले.
लारा म्हणाले, “रोहित शर्मासारखा खेळाडू कसोटी क्रिकेट टी20 प्रकाराला सारखा खेळतो. जेव्हा त्याचा दिवस असे आणि खेळपट्टी चांगली असेल, आणि सामन्यातील परिस्थिती चांगली असेल तर तो माझा विक्रम मोडू शकेल.”
यानंतर लाराने युवा फलंदाज पृथ्वी शॉचे नाव घेतले. ते म्हणाले की शॉ खूपच प्रतिभावान खेळाडू आहे आणि त्याच्यात क्षमता आहे. शॉची पुढे अजून खूप कारकिर्द आहे आणि त्यांना वाटते की तोदेखील त्यांचा विक्रम मोडण्यात यशस्वी होऊ शकेल.
कसोटीत एका डावात सर्वोच्च वैयक्तिक खेळी करण्याचा विक्रम सध्या लारा यांच्या नावावर आहे. त्यांनी एप्रिल 2004 ला इंग्लंड विरूद्ध चौथ्या कसोटीत खेळताना नाबाद 400 धावा केल्या होत्या.
या विंडीजच्या खेळाडूने ४ वर्षीय चिमुकलीला दिली खास भेट; जिंकले भारतीय चाहत्यांचे मन
वाचा????https://t.co/hf4iVTcjHw????#म #मराठी #INDvsWI #Cricket @Mazi_Marathi @MarathiRT— Maha Sports (@Maha_Sports) December 9, 2019
दक्षिण आशियाई स्पर्धेत भारतीय कबड्डी संघाला दुहेरी सुवर्णमुकुट
वाचा????https://t.co/ilpwHCh74U????#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi #Kabaddi #KhelKabaddi— Maha Sports (@Maha_Sports) December 9, 2019






