इंग्लंडचा युवा फलंदाज हॅरी ब्रुक कसोटी क्रिकेटमध्ये कमी काळात चमकदार कामगिरी करू शकला आहे. आयपीएल 2023मध्येही ब्रुककडून चांगल्या प्रदर्शनाच्या अपेक्षा चाहत्यांना होत्या. मात्र, ब्रुकला चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करता आल्या, असे दिसत नाही. असे असले तरी, ब्रुकने आयपीएलच्या या हंगामात एक शतक मात्र नक्कीच ठोकले. ब्रायन लारा यांच्या एका निर्णयामुळे ब्रुकला हे शतक करता आले, असेच दिसते. ब्रुकने स्वतः याविषयी खुलासा केला आहे.
हॅरी ब्रुक (Harry Brook) याने आयपीएल 2023च्या सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी मध्यक्रमात फलंदाजी केली होती. पण त्यानंतर ब्रुकला हैदराबाद संघाचे मुख्य प्रशिक्षक ब्रायन लारा यांच्याकडून डावाची सुरुवात करण्याचा सल्ला मिळाला. लारांच्या या सल्यानंतरच ब्रुकने हैदराबादसाठी पहिल्या क्रमांकाल फलंदाजी केली आणि शतक देखील केले. ब्रुक एक कसोटी फलंदाज असल्यामुळे लारांकडून हा सल्ला दिला गेला होता.
ब्रुकने हंगामातील पहिल्या दोन सामन्यांमध्ये मध्यक्रमात फलंदाजी केली होती. यादरम्यान त्याने अवघ्या 16 धावा केल्या होत्या. पण त्यानंतर त्याला सलामीवीर म्हणून संघात संधी मिळाली. हंगामातील आपल्या चौथ्या सामन्यात त्याने कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध इडन गार्डन स्टेडियमवर शतक ठोकले. असे असले तरी, मागच्या दोन सामन्यांमध्ये त्याला पुन्हा मध्यक्रमात खेळवले गेले. या दोन्ही सामन्यांमध्ये ब्रुकने शुन्यावर विकेट्स गमावल्या.
हॅरी ब्रुककडून ब्रायन लारांच्या वक्तव्याचा खुलासा
ब्रुक इएसपीएन क्रिकइन्फोवर याविषयी बोलला आहे. ब्रुक म्हणाला, “लाराने मला सांगितले की, मी कसोटी खेळाडू आहे. मी स्वीग चेंडूचा सामना करू शकतो, हे त्यांना माहीत होते. परिस्थितीनुसार स्वतःचा खेळही बदलू शकतो. त्यामुळेच त्यानी मला सलामीला खेळायला पाठवले. मी ही जबाबदारी आधी कधीच पार पाडली नव्हती. पण या भूमिकेतील दुसऱ्याच सामन्यात मी शतक केले.” दरम्यान, हॅरी ब्रुकला खरेदी करण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद संघाने 13.25 कोटी रुपये खर्च केले आहेत. चालू आयपीएल हंगामातील 9 सामन्यांमध्या त्याने आतापर्यंत 163 धावा केल्या आहेत. केकेआरविरुद्धचे शतक सोडले तर इतर सामन्यांमध्ये ब्रुकने चाहत्यांची चांगलीच निराशा केली आहे. (‘Brian Lara told me that I am a Test player…’ Harry Brook revealed )
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘रोहितने त्याचे नाव No Hit Man ठेवले पाहिजे’, शून्यावर बाद होताच मुंबईच्या कॅप्टनवर भडकला भारतीय दिग्गज
हार्दिंक विरुद्ध कृणाल! नाणेफेक जिंकून लखनऊने घेतली गोलंदाजी, डी कॉकचा हंगामातील पहिलाच सामना




