भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून उभय संघात ३ सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. पाहुण्या भारतीय संघाने या मालिकेतील पहिला वनडे सामना जिंकला असून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यातील चित्तथरारक विजयानंतर भारतीय संघाच्या ताफ्यात सर्वत्र आनंदी आनंद परसला होता. एका दिग्गज क्रिकेटरने या आनंदाला आणखी चार चाँद लावले. वेस्ट इंडिजचा दिग्गज ब्रायन चार्ल्स लारा याने भारतीय खेळाडूंना आनंद द्विगुणित केला.
या सामन्यात (INDvsWI) प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने (Team India) वरच्या फळीच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर ३०८ धावा फलकावर लावल्या होत्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ निर्धारित ५० षटकात ३०५ धावाच करू शकला. अशाप्रकारे भारतीय संघाने ३ धावांनी हा सामना जिंकला. विजयानंतर भारतीय संघाचे सर्व खेळाडू उत्साहित आणि खुश होते. मात्र लाराने (Brian Lara) त्यांच्या आनंदाला द्विगुणित केले.
क्रिकेटविश्वातील दिग्गज खेळाडूंमध्ये गणल्या जाणाऱ्या लाराने अचानक भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश करत सर्व खेळाडूंना सरप्राइज दिले. स्वत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय, BCCI) सोशल मीडियावर या प्रसंगाचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत दिसते की, लारा युझवेंद्र चहल, श्रेयस अय्यर, शिखर धवन (Shikhar Dhawan) अशा भारतीय खेळाडूंशी भेटतो आणि त्यांच्याशी काही वेळ गप्पा मारतो आहे.
त्याआधी लाराने भारतीय संघाचे विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड यांची भेट घेतली होती. बीसीसीआयने द्रविड आणि लाराचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला होता.
Two Legends, One Frame! 🙌 🙌#TeamIndia | #WIvIND pic.twitter.com/CdCUj6Y2Rp
— BCCI (@BCCI) July 23, 2022
हा व्हिडिओ शेअर करत बीसीसीआयने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, पाहा भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूमला भेट द्यायला कोण आले आहे. हा दिग्गज ब्रायल चार्ल्स लारा आहे. या कॅप्शनसोबत बीसीसीआयने टाळ्या वाजवताना इमोजीही जोडला आहे. अर्थातच टाळ्यांसह बीसीसीआयने लाराचे स्वागत केले आहे.
Look who came visiting the #TeamIndia dressing room 👏 👏
The legendary Brian Charles Lara! 👍 👍#WIvIND | @BrianLara pic.twitter.com/ogjJkJ2m4q
— BCCI (@BCCI) July 23, 2022
दरम्यान उभय संघांमधील आणखी २ वनडे सामने खेळायचे शिल्लक आहेत. जर भारतीय संघाने ही मालिका जिंकली तर भारतीय संघ एका संघाविरुद्ध सर्वाधिक सलग वनडे मालिका जिंकण्याचा पराक्रम करेल. सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध सलग ११ वनडे मालिका विजयांसह भारतीय संघ संयुक्तपणे अव्वलस्थानी आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
क्रिकेटर मोहम्मद शमीच्या दारात आलिशान ‘जॅग्वार’, खरेदी केली ९८ लाख रुपयांची कार
अभिमानास्पद! नीरज चोप्राने रचला इतिहास, World Athletics Championshipमध्ये जिंकले रौप्य पदक
चहल भाऊ लईच नशीबवान! चाहते तर सोडाच आता पत्नीच म्हणाली, “मीच तुझी सर्वात मोठी…”