---Advertisement---

घरच्यांना त्रास द्यायचा म्हणून या क्रिकेटरला लहानपणी ठेवयाचे झोपाळ्याला बांधून

On: शनिवार, एप्रिल 11, 2020 4:16 PM
---Advertisement---

लॉकडाऊनच्या काळात सध्या भारतीय क्रिकेटपटू अधिक प्रमाणात सोशल मीडियावर सक्रिय झालेले पहायला मिळतात. यामध्ये सध्या भारतीय संघाचा फिरकीपटू गोलंदाज युजवेंद्र चहल टिक-टॉकवर व्हिडिओ तयार करत आहे.

चहलने (Yuzvendra Chahal) जतीन सप्रूबरोबरच्या (Jatin Sapru) चर्चेत लॉकडाऊन (Lockdown) दरम्यान आपली परिस्थिती आणि आयुष्यातील अनेक घडामोडींबद्दल खुलासा केला आहे. यादरम्यान त्याने लहानपणी कशाप्रकारे झोपाळ्याला बांधून मारले जात होते, याचाही खुलासा केला आहे.

सुरुवातीला बाहेर जास्त खेळायचो आणि उशिरा झोपीतून उठायचो, त्यामुळे आई बाबांचा खूप ओरडा खावा लागत होता. कधी कधी तर मारही खावा लागत असे. याविषयी बोलताना तो म्हणाला, “जेव्हा आई-बाबा बाहेर जात होते, तेव्हा माझी बहीण मला म्हणायची की मी तुझे हात बांधणार आहे. हे तुला सोडायचे आहेत.”

“त्यानंतर ती त्याला झोपाळ्याला बांधून तसेच सोडून जायची. मग संध्याकाळी आई-बाबा घरी आल्यानंतर मला झोपाळ्याला बांधलेले पाहून त्यांना वाटायचे की मी काहीतरी चूक केली आहे. त्यामुळे ते पण मला मारत होते,” असेही चहल पुढे म्हणाला.

वडिलांनी केलेल्या मारहाणीची आठवण करुन सांगिताना चहल म्हणाला की, “अभ्यासादरम्यान तो अनेक वेळा पाढे विसरायचा. त्यामुळे त्याच्या कानाखाली एक जोरदार चापट लावली जात होती. यानंतर त्याला जेवढं लक्षात असायचे, ते पण तो विसरून जायचा.”

आपल्या कारकीर्दीशी संबंधित घटनेचा खुलासा करत चहल म्हणाला की, “त्याला २०१८मध्ये इनकम टॅक्स इन्स्पेक्टरची (Income Tax Inspector) नोकरी मिळाली होती. परंतु त्याला वाटत होते की, त्याच्याकडे पाहून कोणालाच विश्वास नाही बसणार की, तो इन्स्पेक्टर आहे.”

चहल भारतीय संघाचा फिरकीपटू गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत ५२ वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने २५.८३ च्या सरसरीने ९१ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने ४२ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने  २४.३४ च्या सरासरीने ५५ विकेट्स घेतल्या आहेत.

ट्रेंडिंग घडामोडी-

-क्रिकेटमध्ये वापरले जाणारे वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू

-माजी गोलंदाज म्हणतोय, माझं आणि पीटरसनचं अजिबात नव्हतं जमतं

-क्रिकेट संपलं! आता धोनीने सुरु केला दुसराच उद्योग 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---