ऑस्ट्रेलियात सध्या दोन मोठ्या स्पर्धा सुरू आहेत. एक म्हणजे 8वा टी20 विश्वचषक आणि दुसरी स्पर्धा म्हणजे महिला बिग बॅश लीग होय. या लीगमध्ये महिला खेळाडूंनी केलेल्या अफलातून कामगिरीचे दर्शन अनेकदा घडताना दिसते. असेच काहीसे आताही घडले आहे. महिला बिग बॅश लीगमधील 19वा सामना ऍडलेड स्ट्रायकर्स विरुद्ध ब्रिस्बेन हिट संघात गुरुवारी (दि. 27 ऑक्टोबर) खेळला गेला. हा सामना ऍडलेड स्ट्रायकर्स या संघाने 31 धावांनी जिंकला. मात्र, यादरम्यान ब्रिस्बेन हिट संघाच्या एका महिला खेळाडूने अविश्वसनीय झेल घेत सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले. यादरम्यानचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
ब्रिस्बेनच्या ऍलन बॉर्डर फिल्ड मैदानावर ऍडलेड स्ट्रायकर्स विरुद्ध ब्रिस्बेन हिट (Adelaide Strikers Women vs Brisbane Heat Women) संघात सामना खेळला गेला. या सामन्यात ब्रिस्बेन संघाने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजीला आलेल्या ऍडलेड संघाकडून फलंदाजी करणाऱ्या लॉरा वोल्वार्ड (Laura Wolvaardt) हिची महत्त्वाची विकेट चार्ली नॉट (Charli Knott) हिने शानदार झेल घेतल्यामुळे मिळाली. यादरम्यानचा व्हिडिओ व्हायरल होत असून सर्वांच्याच पसंतीस पडला आहे.
https://www.instagram.com/reel/CkNk9loJL0e/?utm_source=ig_embed&ig_rid=464d168f-243f-4c19-9084-b70e8ee4540c
ऍडलेड स्ट्रायकर्स (Adelaide Strikers) संघाची फलंदाज लॉरा ही फलंदाजी करत होती आणि संघाला तिने चांगली सुरुवात करून दिली होती. अशात डावाच्या 14व्या षटकात तिच्या बॅटची कड घेत चेंडू पॉईंटच्या दिशेने गेला, जिथे उभ्या असलेल्या 19 वर्षीय चार्ली नॉट हिने धावताना डाईव्ह मारली आणि हा शानदार झेल घेतला. सोशल मीडियावर या कॅचची सर्वत्र प्रशंसा केली जात आहे. ब्रिस्बेन हिटने हा व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “आम्ही नि:शब्द आहोत. चार्ली नॉट तू काय कमालीचा झेल घेतला आहे.”
Lost for words… Charli Knott, you little RIPPPERRRR#BringTheHEAT #WBBL08 pic.twitter.com/0D9ThCuZ0M
— Brisbane Heat (@HeatBBL) October 27, 2022
सामन्याचा आढावा
या सामन्यात ऍडलेड स्ट्रायकर्स संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकात 140 धावा चोपल्या होत्या. आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या ब्रिस्बेन संघाचा डाव 109 धावांवरच संपुष्टात आला होता. यामध्ये चार्ली नॉट हिने सर्वाधिक 29 धावांचे योगदान दिले होते.
महिला बिग बॅश लीगमधील ब्रिस्बेन हिट संघाचा हा सहावा सामना होता. या सामन्यात ब्रिस्बेनला ऍडलेड स्ट्रायकर्स संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला. यापूर्वी ब्रिस्बेन संघाने सलग चार सामन्यात विजय मिळवला होता. गुणतालिकेत बिस्बेन हिट 6 पैकी 4 सामन्यात विजय मिळवत दुसऱ्या स्थानी आहे. दुसरीकडे, ऍडलेड स्ट्रायकर्स संघानेही 6 पैकी 4 सामने जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“दक्षिण आफ्रिकेकडे रबाडा अन् नॉर्किया असतील, तर आमच्याकडे विराट भाई आहे”
‘दोन तास हा इंग्रजीचं व्याकरण चेक करत होता’, झिम्बाब्वेची प्रशंसा करताच चाहत्यांकडून कामरान अकमल ट्रोल