भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान ब्रिस्बेन येथे सुरू असलेल्या मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने तब्बल 4 बदल केलेले आहेत. सिडनी येथे झालेल्या सामन्यात रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, हनुमा विहारी व जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त झाल्याने त्यांच्या जागी वॉशिंग्टन सुंदर, मयंक अग्रवाल, शार्दुल ठाकुर व टी नटराजन यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. यादरम्यानच या सर्व भारतीय खेळाडूंचा अनुभव व ऑस्ट्रेलियाच्या संघातील खेळाडूंच्या अनुभवामध्ये प्रचंड मोठी तफावत जाणवत आहे.
ब्रिस्बेन येथे होत असलेल्या कसोटी सामन्यात खेळणाऱ्या भारतीय संघातील सर्व 11 खेळाडूंनी मिळून एकूण 254 कसोटी सामने खेळले आहेत. तर ऑस्ट्रेलियन संघातील सर्व खेळाडूंनी मिळून 504 सामने खेळलेले आहेत. विशेषतः सर्वात जास्त तफावत जाणवते ती गोलंदाजी विभागात. भारतीय गोलंदाजांच्या अनुभवाचा विचार केला असता त्यांनी केवळ 13 विकेट मिळवलेल्या आहेत. तर ऑस्ट्रेलियन संघाच्या गोलंदाजांनी तब्बल 1046 फलंदाजांना बाद केलेले आहे. भारतीय संघातील सर्व फलंदाजांनी मिळून 14814 धावा केलेल्या आहेत. तर ऑस्ट्रेलियन संघातील फलंदाजांनी 23767 इतक्या विशालकाय धावा केल्या आहेत.
ऑस्ट्रेलियन संघापुढे भारतीय गोलंदाजी फारच कमी अनुभवी जाणवत आहे. ब्रिस्बेन कसोटीत वॉशिंग्टन सुंदर व टी नटराजन यांनी आपले कसोटी पदार्पण केले आहे. तर मोहम्मद सिराजने 2 तसेच नवदीप सैनी व शार्दुल ठाकूरने प्रत्येकी 1 सामना खेळलेला आहे. मात्र अशा कठीण परिस्थितीतही भारताने पहिल्या दिवशी उत्तम कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला धावांसाठी संघर्ष करण्यास भाग पाडले आहे. तसेच दुसऱ्या दिवशी पहिल्याच सत्रात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 369 धावांवर गुंडाळला.
या सामन्याच दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसाच्या व्यत्ययामुळे दुसऱ्या सत्रानंतर थांबवण्यात आला. त्यामुळे दुसऱ्या दिवसाखेर भारताने 2 बाद 62 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
शंभरावा कसोटी सामना खेळणाऱ्या नॅथन लायनचे ‘असे’ झाले प्रेक्षकांकडून स्वागत, पाहा व्हिडिओ