बर्मिंघहम | भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली जगातील सर्वोत्तम फलंदाज का आहे, हे लवकरच ब्रिटिश जनतेला कळेल, असे वक्तव्य भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी केले आहे.
२०१४ च्या इंग्लंड दौऱ्यात विराट कोहली कसोटी मालिकेत पूर्णपणे निष्प्रभ ठरला होता.
गेल्या चार वर्षात जगभरातील सर्वच मैदानावर कोहलीची कामगिरी सरस झाली आहे.
तरीही विराटची या इंग्लंड दौऱ्यात कामगिरी कशी होईल याबद्दल सर्वजन प्रश्नचिन्ह उभे करत आहेत.
असे असले तरी भारताचे प्रशिक्षक रवि शास्त्रींनी मात्र विराटची पाठराखन करत, त्याने गेल्या चार वर्षात केलेल्या कामगिरीचे कौतुक केले आहे.
‘गेल्या चार वर्षातील विराटची कामगिरी पहा. त्याने गेल्या चार वर्षात काय केले आहे, हे मी वेगळे सांगायची गरज नाही. विराटच्या या कामगिरीमुळे तो आता वेगळ्या स्तरावर पोहचला आहे. त्यामुळे तो कायमच नव्या आव्हानांसाठी तयार असतो.” असे शास्त्री म्हणाले.
“हो मला मान्य आहे की चार वर्षापूर्वी जेव्हा तो इथे आला होता तेव्हा त्याची कामगिरी चांगली झाली नव्हती. मात्र चार वर्षानंतर तो जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. तो ब्रिटिश जनतेला दाखवू इच्छीत आहे की, तो जगातील सर्वोत्तम फलंदाज का आहे.” विराट विषयी बोलताना शास्त्री असे म्हणाले.
२०१४ च्या दौऱ्यात कोहलीची कामगिरी अत्यंत सुमार झाली होती. त्याला पाच कसोटी सामन्यात १३.४० च्या सरासरीने फक्त १३४ धावा करता आल्या होत्या.
त्यामुळे विराट कोहली इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
-वाढदिवस विशेष- बर्थडे बाॅय जेम्स अॅंडरसनबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी
-खेळात मैत्री नाहीच! आयपीएलमधील मैत्री विसरुन हा खेळाडू आता काढणार भारतीय गोलंदाजांची पिसे