---Advertisement---

क्रिकेटपटू चहलचा मोठा निर्णय! प्रेमाच्या खेळात पराभव?

On: गुरूवार, फेब्रुवारी 20, 2025 7:58 PM
Yuzvendra-Chahal-And-Dhanashree-Verma
---Advertisement---

भारतीय संघाचा गोलंदाज युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांनी एकमेकांना कायद्याने घटस्फोट दिला आहे. घटस्फोटासंबंधी बाकीच्या नियमावली आज न्यायालयामध्ये पूर्ण होणार होत्या. चहल आणि धनश्रीला मुंबईच्या वांद्र्यातील स्थित फॅमिली कोर्टामध्ये बोलावण्यात आलं होतं. जिथे त्यांच्या दोघांकडून घटस्फोटासंबंधी सर्व कार्यवाही पूर्ण केली जाणार होती.

सूत्रांच्या अनुसार युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा आज 4 वाजता न्यायालयात जज समोर हजर राहणार होते. तिथे त्या दोघांनाही घटस्फोटाचे अधिकृत प्रमाणपत्र दिले जाणार होते.

रिपोर्टच्या अंदाजानुसार धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहलने आपल्या स्वइच्छेने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. वांद्र्यातील कोर्ट मध्ये उपस्थित एका वकिलांनी माहिती देताना सांगितले की, मागच्या काही आठवड्यांपासून चहल आणि धनश्री वेगळे होण्याच्या चर्चां सोशल मीडियावर पसरत आहेत . पण या अफवा आता खऱ्या गोष्टींमध्ये रूपांतरीत होत आहेत. तसेच आत्तापर्यंत दोघांनीही घटस्फोटांच्या चर्चांवर उत्तर दिले नाही.

एक विचार करण्याजोगी गोष्ट आहे की, घटस्फोटासंबधी आधी कोर्टात हजर राहण्यापूर्वी काही तास आधी युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांनी सोशल मीडियावर स्टोरी पोस्ट करत देवाचे आभार मानले आहेत. युजवेंद्रने लिहिल आहे की, देव कित्येकदा संकटात त्याच्यासोबत होता. या गोष्टींवरून घटनेचं मूळ शोधणे अवघड आहे , तसेच चहलने‌ देव कायम त्याच्यासोबत आहे असं म्हणत देवाचे आभार मानले आहेत.

दुसरीकडे धनश्री वर्माने इंस्टाग्राम स्टोरी ‌पोस्ट करत ‌लिहिले आहे की, तणावातून मुक्त होऊन ती म्हणते की, कठीण परिस्थितीमध्ये माणसे तणावात असतात, पण देवाला सगळं माहिती असतं. त्यामुळे देव सगळं चांगलंच करतो. त्याशिवाय सोशल मीडियावर ही चर्चा देखील पसरली आहे की, युजवेंद्र चहलने एलीमनीच्या स्वरूपात धनश्रीला 60 करोड रुपयांची मोठी रक्कम देणार आहे.

हेही वाचा 

अफगाणिस्तान सेमीफायनल खेळणार; ‘या’ दिग्गजाने केली मोठी भविष्यवाणी

मोहम्मद शमीने रचला इतिहास! भारतासाठी अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू

चॅम्पियन्स ट्राॅफीतून बाहेर पडल्यानंतर पाकिस्तानचा स्टार फलंदाज निराश..! म्हणाला…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---