आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (ICC Champions Trophy 2025) सुरू होताच पाकिस्तान संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा अनुभवी फलंदाज फखर झमान (Fakhar Zaman) दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच षटकात त्याला दुखापत झाली आणि त्याची दुखापत इतकी गंभीर होती की त्याला संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. यानंतर आता त्याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात फखर झमानला दुसऱ्या चेंडूवरच क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली. त्याला ताबडतोब मैदान सोडावे लागले. यानंतर, तो निश्चितच फलंदाजीला आला पण त्याला जास्त धावा करता आल्या नाहीत. यानंतर बातमी आली की तो संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडल्यानंतर फखर झमानने निराशा व्यक्त केली आहे. त्याने ‘एक्स’वर पोस्ट करत लिहले की, “पाकिस्तानकडून सर्वात मोठ्या स्तरावर खेळणे, हे या देशातील प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न आणि सन्मान आहे. मी भाग्यवान आहे की, मला पाकिस्तानकडून अभिमानाने खेळण्याची संधी अनेक वेळा मिळाली. दुर्दैवाने मी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडलो आहे.
पुढे बोलताना तो म्हणाला, “अल्लाह सर्वोत्तम योजनाकार आहे. या संधीबद्दल मी आभारी आहे. मी घरून पाकिस्तान संघाला पाठिंबा देत राहीन. ही तर फक्त सुरुवात आहे. पुनरागमन हे अपयशापेक्षा अधिक मजबूत असेल.”
महत्त्वाच्या बातम्या-
रोहित शर्मा आणि भारतीय संघाचे भविष्य चॅम्पियन्स ट्रॉफीवर अवलंबून? माजी दिग्गजाचे मोठे वक्तव्य
शुबमन गिल भारताचा उपकर्णधार कसा झाला? रोहित शर्माने सांगितले मोठे कारण!
वीरेंद्र सेहवाग आणि पार्थिव पटेलची बाबर आझमवर खिल्ली, चाहत्यांमध्ये चर्चा






