भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना आता खूपच रोचक झाला आहे. पहिल्या दोन दिवसांत भारताने जोरदार कामगिरी केली होती, पण आता इंग्लंडचे खेळाडू पहिल्या डावात चांगली खेळी दाखवत आहेत. भारताच्या 587 धावांच्या प्रत्युत्तरात, इंग्लंडची स्थिती एकवेळ फारच खराब झाली होती. कारण फक्त 84 धावांवर त्यांच्या 5 विकेट्स पडल्या होत्या. तेव्हा असं वाटलं होतं की इंग्लंडचा डाव लवकर संपेल.
पण हॅरी ब्रूक आणि जेमी स्मिथ (Harry Brook & Jemi Smith) वेगळ्याच आत्मविश्वासाने खेळत होते. दोघांनी आक्रमक शैलीत फलंदाजी करत शतके झळकावली. त्यांच्या भागीदारीत आतापर्यंत 200 पेक्षा जास्त धावा झाल्या आहेत.
खरं तर इंग्लंडने पहिल्या 5 विकेट्स फक्त 84 धावांवर गमावल्या होत्या. त्यानंतर जेमी स्मिथ आणि हॅरी ब्रूक यांनी खेळपट्टीवर ठामपणे खेळत 200 धावांची भागीदारी करत इतिहास रचला. भारताविरुद्ध इंग्लंडने पहिल्यांदाच सहाव्या विकेटसाठी 200 धावा जोडल्या आहेत. याआधी 2014 मध्ये ट्रेंट ब्रिजवर जो रूट आणि जेम्स अँडरसन यांनी दहाव्या विकेटसाठी 198 धावा जोडल्या होत्या. ती भागीदारी सुद्धा ऐतिहासिक मानली जाते.
ही फक्त तिसरी वेळ आहे, जेव्हा कसोटी क्रिकेटमध्ये 200 धावांची भागीदारी झाली आहे. यापूर्वी 1955 मध्ये ब्रिजटाउनमध्ये वेस्ट इंडीजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि 2009 मध्ये अहमदाबादमध्ये भारताने श्रीलंकेविरुद्ध सहाव्या विकेटसाठी 200 धावांची भागीदारी केली होती.
सध्या इंग्लंडने पहिल्या डावात 5 विकेट गमावून 300 धावा केल्या आहेत. भारताने पहिल्या डावात 587 धावा केल्या होत्या. तिसऱ्या दिवसाच दुसर सत्र सुरू आहे. हॅरी ब्रूक 111 आणि जैमी स्मिथ 132 धावांवर नाबाद खेळत आहेत. दोघांनी 227 चेंडूत 215 धावांची भागीदारी केली आहे. अजूनही इंग्लंड भारतापेक्षा 288 धावांनी मागे आहे. 84 धावांवर 5 विकेट्स गेल्यानंतर इंग्लंडने ऐतिहासिक पुनरागमन केलं आहे.