---Advertisement---

IND vs ENG: भारताविरुद्ध सर्वात वेगाने कसोटी शतक कोणत्या फलंदाजाने ठोकलं? ही आहे टॉप 5 खेळाडूंची यादी

On: शुक्रवार, जुलै 4, 2025 7:50 PM
---Advertisement---

टीम इंडिया (Team india) सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना एजबेस्टनमध्ये सुरू आहे. पहिल्या दोन दिवसांत भारतीय संघाने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये चांगली कामगिरी केली. तिसऱ्या दिवशी लगेचच सलग 2 विकेट घेतल्या. एका क्षणी इंग्लंडने केवळ 84 धावांवर त्यांच्या टॉप 5 खेळाडू गमावले होते. तेव्हा वाटले इंग्लंडची खेळी कोसळेल. पण युवा फलंदाज जेमी स्मिथ (Jemi Smith) वेगळ्याच अंदाजात मैदानात उतरला. त्याने आल्यावर वनडे शैलीत फलंदाजी सुरू केली आणि झंझावाती शतक ठोकले.

जेमी स्मिथने (Jemi Smith) फक्त 80 चेंडूंमध्ये शतक झळकावले आणि हॅरी ब्रूकसोबत (Harry Brook) 170 धावांची भागीदारी रचली. ब्रूक 93 धावांवर नाबाद आहे. स्मिथने 80 चेंडूंमध्ये शतक करत विक्रम त्याच्या नावावर केला आहे. भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने शतक करणारा तो जगातील चौथा खेळाडू ठरला आहे. सध्या एजबेस्टनमध्ये सामन्याचा तिसरा दिवस आहे आणि दुसर सत्र सुरू आहे. टीम इंडियाने (Team india) केलेल्या 587 धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने 5 विकेट गमावून 256 धावा केल्या आहेत. अजूनही इंग्लंड 331 धावांनी पिछाडीवर आहे.

जेमी स्मिथ (Jemi Smith) भारताविरुद्ध कसोटी सामन्यात सर्वात वेगाने शतक करणारा चौथा खेळाडू ठरला आहे. त्याने कामरान अकमलचा (Kamran Akmal) विक्रम मोडला. अकमलने (2006) मध्ये लाहोर येथे 81 चेंडूंमध्ये शतक झळकावले होते. या यादीत पहिल्या क्रमांकावर डेविड वॉर्नर (David Warner) आहे, ज्यांने 2012 मध्ये पर्थच्या मैदानावर केवळ 69 चेंडूंमध्ये शतक ठोकले होते. हा विक्रम आजही टिकून आहे.

भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने शतक करणारे खेळाडू

डेविड वॉर्नर – 69 चेंडू पर्थ (2012)

एबी डिविलियर्स- 75 चेंडू सेंच्युरियन (2011)

शाहिद आफ्रिदी- 78 चेंडू लाहोर (2006)

जेमी स्मिथ- 80 चेंडू बर्मिंघम (2025*)

कामरान अकमल – 81 चेंडू लाहोर (2006)

जेमी स्मिथ (Jemi Smith) इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने शतक करणाऱ्या तिसऱ्या खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे. त्याने एजबेस्टनमध्ये 80 चेंडूंमध्ये शतक केले. हॅरी ब्रूकनेही न्यूझीलंडविरुद्ध 80 चेंडूंमध्ये शतक झळकावले होते. इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने शतकाचा विक्रम गिल्बर्ट जेसप याच्या नावावर आहे. त्याने 1902 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध हा पराक्रम केला होता. हा विक्रम देखील आजपर्यंत कायम आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---