बऱ्याच खेळांमध्ये आपण अनेकदा दोन भावंडांच्या जोडीला एकाच देशातून खेळताना पाहिले आहे. क्रिकेट विश्वात अनेकदा एकाच कुटुंबातील भावंडाच्या जोडीने त्यांच्या खेळामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक वेगळीच छाप देखील सोडली आहे, यांपैकी कोणी हिट ठरलंय तर कोणी फ्लॉप.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला असता इरफान पठाण-युसुफ पठाण, ग्रेग चॅपल- इयान चॅपल, मार्क वॉ-स्टीव्ह वॉ, अँडी फ्लॉवर-ग्रॅंट फ्लॉवर यासंख्या अनेक भावंडांच्या जोडीने क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत मोठे नावसुद्धा कमावले आहे. परंतु, काही भावंडाच्या जोड्या अशाही झाल्या आहेत, ज्यातील एक भाऊ एका देशासाठी तर दुसरा दुसऱ्या देशासाठी खेळला आहे.
आज (१० एप्रिल) भावंड दिवस आहे, त्याचनिमित्त या लेखात आपण अशाच काही भावांच्या जोडीबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी वेगवेगळ्या देशातून आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळले आहे.
१) डॅरेन पीटरसन(इंग्लंड) आणि जेम्स पीटरसन(ऑस्ट्रोलिया)
माजी वेगवान गोलंदाज डॅरेन पीटरसन यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला होता. मात्र जन्मानंतर वयाच्या सहाव्या वर्षी ते आपल्या कुटुंबीयांसह ऑस्ट्रेलियामध्ये गेले. डॅरेन पीटरसन यांनी २००७ मध्ये विक्टोरिया तर्फे प्रथम श्रेणीत पदार्पण केले होते. परंतु, नंतर आपल्या कारकिर्दीला पुढे नेण्यासाठी ते पुन्हा इंग्लंडला आले. इंग्लंडमध्ये आल्यावर त्यांनी नॉटिंगहॅमशायरकडून घरगुती क्रिकेट खेळण्यास प्रारंभ केला आणि २००८ मध्ये इंग्लंडकडून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या सामन्यात त्यांना अवघ्या २ विकेट्स मिळाल्या, परंतु त्यानंतर पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांना कधीच खेळण्याची संधी मिळाली नाही.
डॅरेन पीटरसनचा धाकटा भाऊ जेम्स पीटरसनचा जन्म ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे झाला असून त्याने आपल्या कारकिर्दीची सुरवात देखील ऑस्ट्रेलियाकडूनच केली. ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्तम गोलंदाजांपैकी तो एक गणला जातो, तर त्याने आतापर्यंत आपल्या कारकिर्दीमध्ये २१ कसोटी, १५ एकदिवसीय आणि ४ टी-२० सामने खेळले आहेत, ज्यात त्याने अनुक्रमे ८१, १६ आणि ३ विकेट्स घेतल्या आहेत.
२) एड जॉईस (इंग्लंड/आयर्लंड) आणि डोम जॉईस (आयर्लंड)
एड जॉईस आयर्लंड क्रिकेटमधील अनुभवी खेळाडूंपैकी एक मानला जातो. सन २००६ मध्ये ऍड जॉईस याने इंग्लंडच्या राष्ट्रीय संघाकडून पहिला एक दिवसीय सामना खेळला. पण नंतर तो पुन्हा आयर्लंडला परतला. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत १ कसोटी ७८ एकदिवसीय आणि १८ टी-२० सामने खेळले.
एड जॉईसचा भाऊ डोम जॉईस याने १३ जून २००६ ला आयर्लंड संघासोबत खेळताना इंग्लंड विरुद्ध एकदिवसीय क्रिकेट सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आणि विशेष गोष्ट अशी की याच सामन्यात एड जॉईस याने इंग्लंडकडून पाहिला एकदिवसीय सामना देखील खेळला होता. त्यामुळे दोन्ही भावांचे वनडे पदार्पण एकाच दिवशी झाले मात्र वेगवेगळ्या संघाकडून झाले. डोम जॉईस याची क्रिकेटची कारकीर्द फार छोटी होती, ज्यात ३ एकदिवसीय सामने खेळताना त्याने ९.६७ च्या सरासरीने २९ धावा काढल्या होत्या.
३) फ्रॅंक हर्णे (इंग्लंड/ दक्षिण आफ्रिका) आणि जॉर्ज हर्णे/ एलेक हर्णे (इंग्लंड)
केंट काऊंटी क्रिकेट क्लब आणि वेस्टर्न प्रोविंगसाठी खेळणाऱ्या ह्या तीन तीन भावंडांची जोडी ही नामांकित हर्णे कुटुंबापैकी एक. ते १८७९ ते १९०४ या काळात क्रिकेट खेळले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक हुशार क्रिकेटपटू म्हणून फ्रँक हर्णेची ओळख होती. हाच फ्रॅंक दोन देशांकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला.
फ्रॅंकने आपल्या कारकिर्दीची सुरवात १९८९ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी क्रिकेटद्वारे केली. त्यानंतर इंग्लंडकडून तो २ सामने खेळला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेत स्थायिक झाल्यानंतर त्या देशाकडून तो ४ कसोटी सामने खेळला. १८९६ मध्ये तो आपल्या कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला.
फ्रॅंकचे भाऊ जॉर्ज आणि एलेक यांनी इंग्लंड संघाकडून प्रत्येकी १ कसोटी सामना खेळला आहे. आपल्या घरच्या मैदानावर जॉर्जने मोठा विक्रम केला आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ३२८ सामन्यांत ९००० धावा काढून ६८६ बळी घेतले आहेत तर दुसरीकडे एलेकच्या नावावर ४८८ प्रथम श्रेणीत सामने खेळताना १६००० धावा आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
Video: वॉर्नरने ओळखलीय भारतीय चाहत्यांची नस? ‘पुष्पा’ सिनेमातील हुक स्टेप करत जिंकली लाखो मने
Video: चाहत्याची थेट मैदानात एन्ट्री, मग काय रोहितने दिली हवाई मिठी; विराटचेही जिंकले मन
वडिल सायकलपटू, पण मुलगा बनला क्रिकेटर; आता थेट मुंबई इंडियन्सकडून केले आयपीएल पदार्पण