इरफान पठाण आणि युसूफ पठाण या बंधूंची जोडी क्रिकेटजगतात प्रसिद्ध आहे. या बंधूंनी बऱ्याचशा सामन्यात एकत्र खेळत भारतीय संघाना विजय मिळवून दिले. पठाण बंधूंप्रमाणेच आत्तापर्यत क्रिकेटमध्ये अनेक भावांच्या जोड्या होऊन गेल्या, ज्यांनी क्रिकेटमध्ये एक नवी ओळख निर्माण केली. या लेखात आपण अशाच भावांच्या जोड्यांबद्दल जाणून घेऊ.
१. स्टिव्ह आणि मार्क वॉ (ऑस्ट्रेलीया)
स्टिव्ह उजव्या हाताचा उत्कृष्ट फलंदाज तर मार्क डाव्या हाताचा स्वतःची वेगळी शैली असलेला धडाकेबाज फलंदाज. विशेष म्हणजेच हे दोघेही जुळे भाऊ होते. स्टिव्हने विसाव्या वर्षी ऑस्ट्रेलियाच्या संघात स्थान मिळवले. तर मार्कने पदार्पणातच १३८ धावांची खेळी केली. स्टिव्हच्या नेतृत्वखाली ऑस्ट्रेलियाने १९९९ चा विश्वचषक जिंकला.
२. अँडी आणि ग्रॅण्ट फ्लॉवर (झिम्बाब्वे)
अँडी आणि ग्रॅण्ट या दोघा भावांनी भारत विरुद्ध १९९२ मध्ये हरारे येथे पदार्पण केले. अँडी हा ग्रॅण्ट पेक्षा तीन वर्षाने लहान होता. ग्रॅण्ट आणि अँडी या दोन्ही बंधूनी मिळून झिम्बॉब्बे क्रिकेटला एका नव्या उंचीवर नेले होते. या दोघाच्या निवृत्तीनंतर झिम्बॉबेला कधीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगला खेळ करता आला नाही.
३. माईक आणि डेविड हसी (ऑस्ट्रेलिया)
मिस्टर क्रिकेट म्हणून ओळखला जाणारा आणि आपल्या सरळ पण फायदेशीर फडकेबाजीसाठी चर्चेत असलेला माईक हा १६६ दिवसातच कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद १००० धावा करणारा खेळाडू बनला. माईक प्रमाणेच डेव्हिडला ही आंतररराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळायला खूप वाट बघावी लागली. माईक डावखुरा तर डेविड उजव्या हाताचा फलंदाज आहे.
४. ब्रॅंडन आणि नॅथन मॅक्यूलम (न्यूझीलंड)
पॉवर हिटर म्हणून बहुचर्चित असलेला आणि न्यूझीलंडला स्वतःच्या नेतृत्व खाली २०१५च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत नेणारा ब्रॅंडन हा दोन्ही बंधूंमधील जास्त यशस्वी आणि जास्त काळ न्यूझीलंडकडून खेळणारा क्रिकेटपटू आहे. नॅथन हा ब्रॅंडनचा मोठा भाऊ आहे. फिरकी गोलंदाज म्हणून २००७ च्या टी २० विश्वचषकासाठी त्याला संघात स्थान दिले गेले होते.
५. एल्बी आणि मोर्ने मॉर्केल (दक्षिण आफ्रिका)
एल्बी हा लान्स कुल्स्नर सारखीच प्रतिभा असलेला खेळाडू मानला जात होता. तर मोर्ने हा शॉन पोलाक आणि मखाया नतीनी यांची गादी चालवणारा गोलंदाज वाटत होता. मोर्ने मॉर्केलला आपली प्रतिभा दाखवता आली. पण एल्बीला ते काही जमले नाही. मोर्ने मॉर्केल या दोनी भावांमध्ये जास्त यशस्वी ठरला.
महत्त्वाच्या बातम्या –
रक्षाबंधन विशेष: आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या ५ बहीण-भावांच्या जोड्या