---Advertisement---

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानावर एकत्र खेळू शकत नाही बुमराह आणि शमी; जाणून घ्या कारण

On: गुरूवार, नोव्हेंबर 19, 2020 8:18 AM
---Advertisement---

भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी हे ऑस्ट्रेलियाविरुद्ध मर्यादित षटकांचे सामने खेळण्याची शक्यता कमी आहे. संघ व्यवस्थापन त्यांना 17 डिसेंबरपासून सुरू होणार्‍या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळवू पाहत आहे. यासाठी त्यांना तयार ठेवले जात आहे.

भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. हा दोन महिन्यांचा दौरा 27 नोव्हेंबरपासून तीन एकदिवसीय सामन्यांच्या वन डे मालिकेपासून सुरू होईल. यानंतर संघाला टी 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मर्यादित षटकांच्या मालिका सिडनी आणि कॅनबेरा येथे खेळल्या जातील. त्यानंतर कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.

बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुमराह आणि शमीवरील ताणाचे व्यवस्थापन मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. भारतीय संघाचा कसोटी सामन्यांसाठी पहिला सराव सामना 6 ते 8 डिसेंबर दरम्यान खेळला जाईल. यावेळी भारतीय संघाला शेवटची दोन टी -20 आंतरराष्ट्रीय सामने देखील 6 आणि 8 डिसेंबरला खेळायचे आहेत.

6 सामन्यांत एकत्र खेळवायचे धाडस नाही करणार संघ व्यवस्थापन

इशांत शर्माच्या दुखापतीची स्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही, त्यामुळे भारतीय कसोटी मोहिमेसाठी बुमराह आणि शमी दोघेही महत्त्वाचे ठरणार आहेत. अशा परिस्थितीत 12 दिवसांच्या आत होणाऱ्या मर्यादित षटकांच्या सहा सामन्यांमध्ये या दोघांना एकत्र मैदानात उतरविण्याची जोखीम संघ घेऊ शकणार नाही. मंडळाच्या एका सूत्राने सांगितले की, ‘जर बुमराह आणि शमी टी -२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळत असतील तर कसोटी सरावासाठी त्यांना एकच सामना मिळेल, असे मला वाटत नाही की संघ व्यवस्थापनाला हे आवडेल.’

मर्यादित षटकांच्या मालिकेत शमी आणि बुमराह यांना एकत्रितपणे संघात समाविष्ट न करता येण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजेच रोटेशन पद्धत वापरली जाऊ शकते. एक शक्यता अशी असू शकते की दोघेही एकदिवसीय सामन्यात खेळले असता तेथे त्यांना 10 षटके फेकण्याची संधी असेल. एकदिवसीय सामन्यानंतर ते कसोटी सामने खेळतील.

महत्त्वाच्या बातम्या –

“मी ८० वर्षाचा म्हातारा….”, लँगर यांच्या पत्राला ब्रॅडमन यांनी दिले होते मजेशीर उत्तर

Video -‘गेलचे अजूनही आरसीबीवर प्रेम!’ वडीलांनी आरसीबीची कॅप घातल्याने चाहत्यांच्या भावूक प्रतिक्रिया

वासिम जाफरने केले मीम शेअर; बिग बॅशमधील नियमांची उडवली खिल्ली

ट्रेंडिंग लेख –

…अन् धोनीचा सध्या विरोधक झालेल्या खेळाडूलाही धोनीचा ‘रनर’ म्हणून यावे लागले मैदानात

हे तीन परदेशी खेळाडू पुढील आयपीएलमध्ये दिसण्याची शक्यता कमी; दोन माजी कर्णधारांचा समावेश

पॉटींगच्या गोलंदाजी विभागाचा ‘सरसेनापती’ राहिलेल्या ब्रेट लीची अनोखी कहानी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---