---Advertisement---

Video -‘गेलचे अजूनही आरसीबीवर प्रेम!’ वडीलांनी आरसीबीची कॅप घातल्याने चाहत्यांच्या भावूक प्रतिक्रिया

On: बुधवार, नोव्हेंबर 18, 2020 10:36 PM
---Advertisement---

वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलने त्याच्या वडीलांचा सोमवारी(१६ नोव्हेंबर) ९१ वा वाढदिवस साजरा केला. त्याने त्यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे व्हिडिओ आणि फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले होते. हे व्हिडिओ आणि फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. कारण गेलने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये केक कापत असताना त्याच्या वडीलांनी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची कॅप घातलेली दिसून येत आहे.

गेलने त्याच्या वडीलांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की ‘सर गेल, खरे गेल. वाढदिवसाच्या शुभेच्छा डॅड. तुमच्यावर अनंत प्रेम करतो. तुम्ही चांगली फलंदाजी करत आहात. तुम्हाला दिर्घायुष्य लाभो. घरी तुमच्यासाठी नाईट क्लब खुला असेल. डान्सर्स तुमच्या आवडीचे असतील.’

https://www.instagram.com/p/CHqARJ4hg8r/

या पोस्टमध्ये शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये त्याच्या वडीलांनी आरसीबीची कॅप घातलेली दिसून येत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर गेलच्या चाहत्यांनी म्हटले आहे की गेलचे अजूनही आरसीबीवर प्रेम आहे.

https://twitter.com/RegeParag/status/1328578034190999553

https://twitter.com/indianjabrafan/status/1328659697478500352

ख्रिस गेल आयपीएलमध्ये २०११ ते २०१७ दरम्यान आरसीबीकडून खेळला. यावेळी त्याने आरसीबीकडून ३१६३ धावा केल्या आहेत. तसेच तो आरसीबीकडून ३००० पेक्षा अधिक धावा करणारा विराट कोहली आणि एबी डिविलियर्स नंतरचा तिसराच फलंदाज आहे. पण २०१८ च्या आयपीएलआधी आरसीबीने त्याला करारमुक्त केले. त्यामुळे त्याला २०१८ च्या लिलावात किंग्स इलेव्हन पंजाबने संघात घेतले. त्यामुळे २०१८ पासून तो पंजाबकडून आयपीएल खेळतो.

महत्त्वाच्या बातम्या –

वासिम जाफरने केले मीम शेअर; बिग बॅशमधील नियमांची उडवली खिल्ली

“सात समुंदर पार मै तेरे…” भारतीय संघाच्या कॅम्पमध्ये वाजले गाणे आणि धवन, शॉचे थिरकले पाय

मेलबर्न स्टार्सकडून खेळणार झहीर खान; हसीने केले स्वागत

ट्रेंडिंग लेख –

…अन् धोनीचा सध्या विरोधक झालेल्या खेळाडूलाही धोनीचा ‘रनर’ म्हणून यावे लागले मैदानात

हे तीन परदेशी खेळाडू पुढील आयपीएलमध्ये दिसण्याची शक्यता कमी; दोन माजी कर्णधारांचा समावेश

पॉटींगच्या गोलंदाजी विभागाचा ‘सरसेनापती’ राहिलेल्या ब्रेट लीची अनोखी कहानी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---