इंग्लंड दौऱ्यावर असलेला भारतीय क्रिकेट संघ नॉटिंघम येथे पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळत आहे. तीन दिवसाच्या खेळानंतर भारतीय संघाने सामन्यावर पकड बनवली असून, शनिवारी (७ ऑगस्ट) सामन्याचा निर्णायक दिवस असेल. या चौथ्या दिवसाच्या खेळात भारताचे प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी व जसप्रीत बुमराह यांना दिग्गज भारतीय गोलंदाजांना मागे सोडण्याची संधी आहे.
शमी आणि बुमराहकडे आहे ही संधी
नॉटिंघम कसोटीच्या चौथ्या दिवशी इंग्लंड आपल्या दुसऱ्या डावाला बिनबाद २५ धावांवरून सुरुवात करेल. सध्या भारतीय संघाकडे ७० धावांची आघाडी आहे. इंग्लंडचा डाव झटपट गुंडाळून भारतीय संघ विजयासाठी प्रयत्न करेल. इंग्लंड संघाला लवकर बाद करायचे असल्यास भारताच्या वेगवान गोलंदाजांना उल्लेखनीय कामगिरी करावी लागेल.
या दरम्यान भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने तीन बळी मिळवल्यास तो दिग्गज भारतीय फिरकीपटू इरापल्ली प्रसन्ना यांना मागे सोडेल. प्रसन्ना यांनी ४९ कसोटी सामने खेळताना १८९ बळी मिळवले होते. सध्या शमी ५२ सामन्यांतील १८७ बळींसह त्यांच्या पाठीमागे आहे. शमी बरोबरच जसप्रीत बुमराह यालादेखील तीन बळी मिळवून मनिंदर सिंग व बापू नाडकर्णी यांच्या पुढे जाण्याची संधी असेल. मनिंदर यांनी भारतासाठी ३५ सामन्यात ८८ तर, नाडकर्णी यांनी ४१ सामन्यात इतकेच बळी मिळवले होते.
पहिल्या डावात दोघांनी केली धारदार गोलंदाजी
जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी यांनी इंग्लंडचा पहिला डाव १८३ धावांवर गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावत होती. बुमराहने २०.४ षटके गोलंदाजी करताना ४ बळी मिळवले होते. दुसरीकडे शमीने १७ षटकात २८ धावा देऊन तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
रेकॉर्ड अलर्ट! शमी आणि बुमराहकडे आज तीन भारतीय दिग्गजांना मागे टाकण्याची संधी
बुमराहच्या षटकाराने सर्वांनाच घातली भुरळ, सचिनही झालाय प्रभावित; तुम्ही तो सिक्स पाहिलाय ना?ट
सॅम करनच्या षटकात बुमराहने केला चौकार-षटकारांचा वर्षाव, गोलंदाजाच्या चेहऱ्याचा उडाला रंग