---Advertisement---

१३ वर्षांनंतर जसप्रीत बुमराहने केला तो खास कारनामा, झाला या खास यादीत समावेश

---Advertisement---

सबिना पार्क, किंग्स्टन येथे वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात दुसऱ्या दिवसाखेर वेस्ट इंडीजने पहिल्या डावात 7 बाद 87 धावा केल्या आहेत. दुसऱ्या दिवशी भारताकडून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने 6 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये त्याच्या हॅट्रिकचाही समावेश आहे.

तो कसोटीमध्ये हॅट्रिक घेणारा तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याने वेस्ट इंडीज त्यांच्या पहिल्या डावात फलंदाजी करत असताना 9 षटकात हा कारनामा केला.

त्याने या षटकातील दुसऱ्या चेंडूवर डॅरेन ब्रावोला(4), तिसऱ्या चेंडूवर शामर्ह ब्रुक्स(0) आणि चौथ्या चेंडूवर रोस्टन चेसला(0) बाद करत कसोटी कारकिर्दीतील पहिली हॅट्रिक घेतली.

याआधी भारताकडून पहिल्यांदा हरभजन सिंगने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2001 मध्ये कोलकताला झालेल्या कसोटीत हॅट्रिक घेतली होती.

त्यानंतर 5 वर्षांनी 2006 ला कराची येथे भारत विरुद्ध पाकिस्तान संघात झालेल्या कसोटी सामन्यात इरफान पठाणने हॅट्रिक घेतली होती. त्यानंतर आता तब्बल 13 वर्षांनंतर भारताकडून कसोटीत हॅट्रिक घेण्याची कामगिरी बुमराहने केले आहे.

याबरोबरच वेस्ट इंडीजमध्ये कसोटीत हॅट्रिक घेणारा बुमराह हा जगातील केवळ तिसराच गोलंदाज आहे.

याआधी वेस्ट इंडीजच्या जर्मन लावसन यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2003 मध्ये ब्रिजटाऊन येथे हॅट्रिक घेतली होती. त्यानंतर 2004 मध्ये मॅथ्यू होगार्ड या इंग्लंडच्या क्रिकेटपटूनने वेस्ट इंडीज विरुद्ध ब्रिजटाऊन येथेच कसोटीत हॅट्रिक घेतली होती.

किंग्स्टन येथे सुरु असलेल्या वेस्ट इंडीज विरुद्ध भारत सामन्यात भारताने पहिल्या डावात सर्वबाद 416 धावा केल्या आहेत. यामध्ये हनुमा विहारीने 111 धावांची शतकी खेळी केली आहे. तर कर्णधार विराट कोहली(76), सलामीवीर फलंदाज मयंक अगरवाल(55) आणि इशांत शर्माने(57) अर्धशतकी खेळी केली आहे.

#कसोटीत हॅट्रिक घेणारे भारतीय गोलंदाज –

हरभजन सिंग – विरुद्ध ऑस्ट्रेलिया, कोलकाता, 2001

इरफान पठाण – विरुद्ध पाकिस्तान, कराची 2006

जसप्रीत बुमराह – विरुद्ध वेस्ट इंडीज, किंग्स्टन, 2019

#वेस्ट इंडीजमध्ये कसोटीत हॅट्रिक घेणारे गोलंदाज – 

जर्मन लावसन – विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ब्रिजटाऊन, 2003

मॅथ्यू होगार्ड – विरुद्ध वेस्ट इंडीज, ब्रिजटाऊन, 2004

जसप्रीत बुमराह – विरुद्ध वेस्ट इंडीज, किंग्स्टन, 2019

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

इंग्लंडचा स्टार ऑलराउंडर बेन स्टोक्स झाला या फुटबॉल क्लबचा अधिकृत फॅन

१४० किलो वजनाच्या राहकिम कॉर्नवॉल पुजाराची विकेट घेतल्यानंतर म्हणाला…

कर्णधार कोहलीने शानदार अर्धशतक करत क्लाइव्ह लॉइड, ब्रायन लाराला टाकले मागे

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment