---Advertisement---

भन्नाट! रिषभ पंतने बुमराहच्या गोलंदाजीवर सिब्लीचा घेतला अप्रतिम झेल, व्हिडिओ व्हायरल

On: रविवार, ऑगस्ट 8, 2021 1:52 AM
---Advertisement---

सध्या नॉटिंगहॅममध्ये भारत आणि इंग्लंड संघामध्ये कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना ४ ऑगस्टपासून खेळण्यास सुरुवात झाला. या सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडचा दुसरा डाव ३०३ धावांवर संपला. पण पहिल्या डावात ९५ धावांची पिछाडी स्विकारल्याने इंग्लंडने भारतासमोर २०९ धावांचे आव्हान ठेवले. दरम्यान, इंग्लंडच्या दुसऱ्या डावात रिषभ पंतने डॉमनिक सिब्लीचा घेतलेल्या झेलाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

पंतने घेतला शानदार झेल 
झाले असे की इंग्लंडने रॉरी बर्न्स आणि जॅक क्रॉली यांच्या विकेट्स लवकर गमावल्या. त्यामुळे डाव सावरण्याची जबाबदारी सलामीवीर डॉमनिक सिब्ली आणि कर्णधार जो रुटवर आली. या दोघांनी एकमेकांची चांगली साथ देत इंग्लंडचा धावफलक हलता राहिल, याची काळजी घेतली. या दोघांची जोडी भारतासाठी डोकेदुखी ठरु लागली होती. त्याचवेळी भारताच्या मदतीला जसप्रीत बुमराह आला.

बुमराहने डावातील ४६ व्या षटकात आणि त्याच्या वैयक्तिक ११ व्या षटकात टाकलेला ५ वा चेंडू सिब्लीच्या बॅटची कड घेऊन यष्टीरक्षक रिषभ पंतच्या हातात गेला. पंतनेही कोणतीही चूक न करता चपळाईने तो चेंडू झेलला. त्यामुळे सिब्लीला २८ धावांवर बाद होत माघारी परतावे लागले. तसेच त्याची आणि रुटची ८९ धावांची भागीदारी तुटली.

रुटच्या शतकी खेळीचा इंग्लंडला आधार 
पुढे रुटने १०९ धावांची शतकी खेळी केली. तसेच जॉनी बेअरस्टोने ३० आणि सॅम करनने ३२ धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त अन्य कोणाला फार काही करता आले नाही. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या.

महत्त्वाच्या बातम्या – 

जो रुटने भारताविरुद्धचा ‘मोठा’ पराक्रमच; कूक, पीटरसन सारख्या दिग्गजांना मागे टाकत पटकावला अव्वल क्रमांक

बुमराहचा बूमरँग! इंग्लंडमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा बनला केवळ तिसरा भारतीय गोलंदाज

सीएसकेचा मोठा निर्णय! सुवर्ण विजेत्या नीरजला देणार एक कोटी आणि ‘ही’ खास भेट

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---