भारतीय क्रिकेट संघाचा युवा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा जागतिक क्रिकेटमधील उच्च दर्जाचा गोलंदाज आहे. क्रिकेट जगतातील नावाजलेल्या फलंदाजांनाही धावा करण्यापासून रोखण्यात त्याला यश आले आहे. एवढेच नव्हे, तर क्रिकेटच्या तीनही प्रकारात तो सातत्याने उत्कृष्ट गोलंदाजी करत आहे. मात्र सन 2020 मधील त्याची कामगिरी पहिली, तर ही बुमराहचीच आकडेवारी आहे का? हा प्रश्न चाहत्यांना नक्कीच पडेल.
शुक्रवारी(27 नोव्हेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे सामन्याआधी बुमराहने या वर्षी एकूण 6 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने एकूण 56.1 षटके फेकली आहेत. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे त्याला फक्त 1 गडी बाद करण्यात यश आलं आहे.
राजकोट येथे 17 जानेवारी 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 340 धावा ठोकल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाला सामना जिंकण्यासाठी अखेरच्या षटकात 36 धावांची गरज होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचे 9 गडी बाद झाले होते.
डावाचे शेवटचे षटक बुमराह फेकायला आला. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू ऍडम झाम्पा फलंदाजी करत होता. बुमराहने झाम्पाला पहिल्याच चेंडूवर तंबूत पाठवले आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
बुमराहने 17 जानेवारी ते 26 नोव्हेंबर या कालावधीत घेतलेली ही एकमेव विकेट होती.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी मालिकेत बुमराह कशी कामगिरी करेल ते पाहावं लागेल.
महत्त्वाच्या बातम्या –
कांगारूंच्या कर्णधाराची पहिल्याच सामन्यात छाप; सलामीच्या शतकासह अनेक विक्रमांना गवसणी
मोठमोठे विक्रम आपल्या नावावर करणारा विराट सिडनी स्टेडीयमवर ‘फ्लॉप’; पाहा आकडेवारी
बापरे! केवळ १५ तासांत होणार ३ आंतरराष्ट्रीय सामने, भारत ऑस्ट्रेलिया वनडे सामन्याने सुरुवात