सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौर्यावर आहे. त्या ठिकाणी ऑस्ट्रेलिया आणि भारत संघात चार कसोटी सामन्याची बॉर्डर गावसकर मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दोन सामने पार पडले आहेत. दुसर्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने शानदार विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व जसप्रीत बुमराहने केले. त्यामुळे पाकिस्तानच्या माजी गोलंदाज शोएब अख्तरने बुमराहची प्रशंसा केली आहे.
भारतीय संघाने मेलबर्न येथे झालेल्या दुसर्या कसोटी सामन्याच्या विजयात जसप्रीत बुमराहने मोलाची भूमिका पार पाडली. त्याने प्रमुख गोलंदाज मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि उमेश यादव यांच्या अनुपस्थित भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजी आक्रमणाची नेतृत्व केले. त्यामुळे पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने मोहम्मद आमिर सोबत जसप्रीत बुमराहचा जगतातील सर्वात चाणाक्ष गोलंदाज म्हणून उल्लेख केला आहे.
जसप्रीत बुमराह जगातील सर्वात चाणाक्ष गोलंदाज
अख्तर स्पोर्ट्स टुडे सोबत बोलताना म्हणाला, “मला वाटते सध्याच्या घडीला जसप्रीत बुमराह सर्वात चाणाक्ष वेगवान गोलंदाज आहे. त्याचबरोबर मोहमद आमिर, वसीम अक्रम आणि जसप्रीत बुमराह मोठे गोलंदाज आहेत. मी मोहम्मद आसिफला गोलंदाजी करताना पाहिले आहे. मी मोहमद आसिफचा सामना करताना फलंदाजांना खरोखर रडताना पाहिले आहे. एकदा व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणाला होता, मी या मुलाचा सामना कसा करू. एबी डिविलियर्स आशियाई कसोटी चॅम्पियनशिप ट्रॉफीमध्ये खरोखर रडायला लागला होता. ”
देहबोलीऐवजी प्रदर्शनात आक्रमकता
अख्तर पुढे म्हणाला, “कसोटी क्रिकेट मध्ये जसप्रीत बुमराहच्या फिटनेसबद्दल लोकांना शंका होती. मी तर त्याला जवळून बघत होतो. त्याच्याकडे बाऊन्सर आहे जो फलंदाजांना समजत नाही आणि अडचणी निर्माण करतो. सर्वात चांगली बाब म्हणजे तो एक चांगला व्यक्ती आहे. भारताचे अधिकतर गोलंदाज हे शारीरिक पद्धतीने नाही तर आपल्या गोलंदाजीने आक्रमकता दाखवतात. ”
जसप्रीत बुमराहने प्रमुख गोलंदाजांच्या अनुपस्थित भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजी आक्रमणाची जबाबदारी पार पाडली. त्याने दोन कसोटी सामन्यात 23.62 च्या सरासरीने 8 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर तो या मालिकेत सर्वात जास्त विकेट्स घेण्याच्या यादीत तिसर्या स्थानी. या यादीत पहिल्या आणि दुसर्या क्रमांकावर अनुक्रमे अश्विन आणि पॅट कमिन्स आहेत. या दोघांनी प्रत्येकी 10 विकेट्स घेतल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या:
युनिव्हर्सल बॉस घेणार निवृत्ती? खुद्द गेलनेच दिले हे उत्तर
खुशखबर! भारतातील क्रीडा सामन्यांना आता ५०% प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी
भारतीय खेळाडूंनी दिल्या नववर्षाच्या हटके शुभेच्छा; पाहा काही खास ट्विट





