आयपीएलच्या 17 व्या हंगामात आज गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे होत आहे. तर या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर गुजरात टायटन्सच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 168 धावा केल्या आहेत.
या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून जसप्रीत बुमराहने 4 षटकात 14 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. तर पियूष चावला याला 1 विकेट मिळाली तसेच गुजरात संघाने गेल्या मोसमात गटात 14 पैकी 10 सामने जिंकले होते, तर मुंबई इंडियन्स संघाने 14 पैकी 8 सामने जिंकले होते. याबरोबरच टायटन्सकडून साई सुदर्शन याने 39 बॉलमध्ये 3 चौकार आणि 1 सिक्ससह 45 धावांची खेळी केली आहे.
दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन-
मुंबई इंडियन्स प्लेइंग 11- हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, नमन धीर, टिम डेव्हिड, शम्स मुलानी, पियुष चावला, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह ,ल्यूक वुड.
गुजरात टायटन्स प्लेइंग 11- शुबमन गिल (कर्णधार), रिद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, रशीद खान, उमेश यादव, आर साई किशोर, स्पेन्सर जॉन्सन.
महत्त्वाच्या बातम्या-
- राहुल आला… खेळला, पण हरला; घरच्या मैदानावर राजस्थानचा लखनऊ सुपर जायंट्सवर दणदणीत विजय
- मुंबई इंडियन्सने जिंकला टॉस, घेतला ‘हा’ निर्णय, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग 11