इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेचा पहिला सामना क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्या लॉर्ड्सच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढाई पाहायला मिळतेय. पहिल्या डावात न्यूझीलंडच्या ३७८ धावांच्या उत्तरात इंग्लंडचा पहिला डाव २७५ धावांवर संपुष्टात आला.
सलामीवीर रॉरी बर्न्सने संघासाठी १३२ धावांची शानदार खेळी साकारली. या खेळीमुळे त्याच्या नावावर खास विक्रम नोंदला गेला. बर्न्स इंग्लंडचा अखेरचा फलंदाज म्हणून बाद होताच त्याने ७० वर्ष जुन्या विक्रमाची बरोबरी केली. न्यूझीलंडच्या पहिल्या डावात पदार्पण करणारा सलामीवीर डेवॉन कॉनवे २०० धावा काढून अखेरचा फलंदाज म्हणून बाद झालेला.
या फलंदाजांनी केली होता पहिल्यांदा कामगिरी
सलामीला आलेला बर्न्स बाद होताच दोन्ही संघांच्या एकातरी सलामीवीराने शेवटपर्यंत फलंदाजी करण्याचा कारनामा केला. यापूर्वी, १९५१ मध्ये ऑस्ट्रेलिया-इंग्लंड सामन्यादरम्यान अशी घटना घडली होती. ऍडलेडमधील या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर आर्थर मॉरिस शेवटचे गडी म्हणून बाद झालेले तर, लेन हटन यांनी इंग्लंडकडून शानदार १५६ धावा केल्या आणि ते नाबाद राहिले. ऑस्ट्रेलियाने हा सामना २७४ धावांनी जिंकला.
बर्न्सचे शानदार शतक
लॉर्ड्स कसोटीच्या चौथ्या दिवशी इंग्लंडने दिवसाचा खेळ १११-२ या धावसंख्येवरून सुरू केला. यावेळी कर्णधार जो रूट ४२ आणि बर्न्स ५९ धावांवर नाबाद होता. सामन्याच्या तिसर्या दिवशी पावसामुळे एकही चेंडू फेकला गेला नाही. तर, जेव्हा चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी खेळपट्टीचा फायदा उठविला.
कायले जेमिसनने चौथ्या दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर इंग्लंडचा कर्णधार जो रुटला झेलबाद केले. त्यानंतर पदार्पण करत असलेला ओली रॉबिन्सन (४२) वगळता इतर फलंदाजांनी बर्न्सला साथ दिली नाही. अखेरच्या गड्यासाठी जेम्स अँडरसनला साथीला घेऊन त्याने ५३ धावा जोडल्या. बर्न्स इंग्लंडकडून बाद होणारा अखेरचा फलंदाज ठरला. न्यूझीलंडसाठी टिम साऊदीने सर्वाधिक ६ बळी मिळवले.
अखेरच्या दिवशी सामना रंगतदार अवस्थेत
न्यूझीलंडने आपला दुसरा डाव ६ बाद १६९ वर घोषित केला. न्यूझीलंडने इंग्लंडसमोर अखेरच्या दिवशी ७५ षटकात २७३ धावांचे लक्ष ठेवले आहे. इंग्लंडचा कल हा सामना अनिर्णित राखण्यासाठी असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
सौरव गांगुलीच्या मुलीबद्दल ‘या’ गोष्टी माहीत आहेत का? ऑक्सफर्ड विद्यापीठातून घेतलंय शिक्षण
व्हिडिओ : जेमिसनच्या स्विंगसमोर इंग्लिश कर्णधार निरुत्तर, दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर रूट बाद