ऑस्ट्रेलियाच्या जंगलामध्ये लागलेल्या आगीत अनेक वन्यप्राण्यांना तसेच लोकांना आपला जीव गमवावा लागला. अशा परिस्थीतीत पीडितांना मदद करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर शेन वाॅर्न पुढे आला आहे.
वाॅर्न पीडित लोकांच्या मददतीसाठी आपल्या कसोटी कॅपचा लिलाव करीत आहे. या लिलावातील सर्व रक्कम पीडितांच्या मदतीसाठी देण्यात येईल. वॉर्न यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर काल(6 जानेवारी) ही घोषणा केली. या ऐतिहासिक कसोटी कॅपचा लिलाव ऑनलाइन वेबसाइटवर सुरू आहे.
वॉर्नने ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड संघात सिडनी क्रिकेट मैदानावर पार पडलेल्या कसोटी सामन्यादरम्यान आपली कसोटी कॅप पकडलेला फोटो काढला आणि या फोटोसह त्याने पीडित व्यक्तींना मदत करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन करणारा एक भावनात्मक संदेश लिहिला आहे.
वॉर्नने ट्विट केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘ऑस्ट्रेलियाच्या जंगलामध्ये लागलेल्या या भयंकर आगीमुळे आमचा विश्वास उडाला आहे. या आगीने कल्पनाशक्ती नष्ट केली आणि याचा लोकांवर गंभीर परिणाम झाला.’
‘बर्याच लोकांनी आपला जीव गमावला, बरीच घरे उद्ध्वस्त झाली आणि 50 कोटींहून अधिक प्राणी मारले गेले. सध्या प्रत्येकजण एकत्र आहे आणि या आपत्तीवर मात करण्यासाठी आणि पीडितांना मदत करण्यासाठी आम्ही नवीन मार्ग शोधत राहू.’
वॉर्नने पुढे लिहिले की, ‘या घटनेने माझ्या सर्वात प्रिय कसोटी कॅपचा लिलाव करण्यास प्रेरित केले, जी कॅप मी माझ्या संपूर्ण कसोटी कारकीर्दीत (मी माझी पांढरी टोपी घातली नव्हती तेव्हा) घातली होती. मला आशा आहे की माझी कसोटी कॅप अशा लोकांच्या मदतीसाठी आहे, ज्यांना मदतीची खूप आवश्यकता आहे.’
Please bid here https://t.co/kZMhGkmcxs pic.twitter.com/ZhpeWQxqY7
— Shane Warne (@ShaneWarne) January 6, 2020
या टेस्ट कॅपवर शुक्रवार 10 जानेवारीपर्यंत (ऑस्ट्रेलियन वेळ सकाळी 10 वाजेपर्यंत) ऑनलाइन बोली लावता येणार आहे. या कॅपवर सर्वाधिक बोली लावणार्याला या कॅपसह वॉर्नचे स्वाक्षरी केलेले प्रमाणपत्रही दिले जाईल. शेन वॉर्न या बोलीवरील सर्व निधी या जंगलातील आगीत सापडलेल्या पीडितांच्या मदतीसाठी दान करणार आहे.
श्रीलंका विरुद्ध कितीही धावा केल्या तरी शिखरपेक्षा हा खेळाडूच भारी!
वाचा- 👉https://t.co/wcDhwmTUbn👈#म #मराठी #Cricket @SDhawan25
— Maha Sports (@Maha_Sports) January 6, 2020
विराटच्या चाहत्याने दिलेली ही भेट पाहून तुम्हीही थक्क व्हाल…
वाचा- 👉https://t.co/2iZVoYwDh5👈#म #मराठी #Cricket @imVkohli— Maha Sports (@Maha_Sports) January 6, 2020