सध्या दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या संघामध्ये कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलिया संघाने जिंकला होता. त्यानंतर बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. हा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी योग्य ठरवला. ऑस्ट्रेलियाच्या कॅमरुन ग्रीन याने 5 विकेट घेत, दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीला सुरुंग लावला.
https://twitter.com/subhu__RO45/status/1607259556887023617?s=20&t=wmTX-Onu4gm92fT-3OKtLQ
या सामन्यात कॅमेरुन ग्रीन (Cameron Green) याने आपल्या कसोटी कारकीर्दीतील पहिला 5 विकेट हॉल घेतला. त्याच्या या कामगिरीमुळे चाहते आणि मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर उपस्थित सर्व प्रेक्षकांनी त्याच्यासाठी उभे राहून टाळ्या वाजवल्या. ग्रीनसाठी बॉक्सिंगडे कसोटी सामन्यात 5 विकेेट हॉल मिळवणे हा विस्मरणीय क्षण असेल. दक्षिण आफ्रिकेसाठी काइल वेरिन आणि मार्को यानसन यांनी चांगली फलंदाजी केली. मात्र, जेव्हा या दोघांची भागीदारी तुटली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ढासाळला. यात ग्रीनचा खूप मोठा हात होता. आता ऑस्ट्रेलिया ज्या परिस्थितीत आहे, त्यामुळे संघ आनंदात असेल.
https://twitter.com/IPL/status/1606244651421286400?s=20&t=Y-UU_3kiDTwNIa1F5qPs_A
कॅमेरुन ग्रीन याच्यासाठी हे वर्ष सदैव आठवणीत राहिल असे गेले आहे. राष्ट्रीय संघात त्याने चांगले प्रदर्शन केले. त्याचबरोबर त्याच्यावर आयपीएलच्या मिनी लिलावात पैशांचा पाऊस पडला. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सर्वात महागड्या खेळाडूंच्या यादीत त्याचे नाव दुसऱ्या स्थानावर आहेे. जेव्हा लिलावात त्याचेे नाव पुकारल्या गेेले, तेव्हा रॉयल चॅलेंजर बंगलोर संघाने त्याच्यावर सर्वात आधी बोली लावली होती. जेव्हा बोली 7 कोटींपर्यंत गेली,तेव्हा मुंबई इंडियन्सनेही या बोलीत उडी मारली. त्यानंतर ग्रीनला खरेदी करण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स संघही शर्यतीत उतरला. शेवटी मुंबईने या लिलावात बाजी मारली आणि 17.50 कोटी रुपयांची बोली लावत कॅमरुनला आपल्या संघात सामील करुन घेेतले. आता ग्रीन आयपीएलमध्ये मुंबई संघासाठी आपल्या गोलंदाजी जोर दाखवताना दिसेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतून रोहित-राहुलचा पत्ता कट? कारणही घ्या जाणून
न्यूझीलंडविरुद्ध 50वी धाव घेताच बाबरकडून पाँटिंगचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त, विराट खूपच मागे






