भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सिडनी येथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात, ऑस्ट्रेलियन संघाने आपले नियंत्रण प्रस्थापित केले आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी (10 जानेवारी) भारतीय गोलंदाज ऑस्ट्रेलियन फलंदाजांना लवकरात लवकर बाद करतील अशी अपेक्षा सर्व क्रिकेटरसिकांना होती. मात्र ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमरून ग्रीनने या आशेवर पाणी फेरले. ग्रीनने सुरुवातीला आपल्या संयमी खेळीने भारतीय गोलंदाजांना थकवले व त्यानंतर जेव्हा डाव घोषित करण्याची वेळ आली तेव्हा मैदानावर षटकारांची आतषबाजी केली.
ग्रीनने ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात 132 चेंडूत 84 धावांची खेळी केली होती. त्याने या खेळीतील सुरुवातीच्या 51 धावा तब्बल 116 चेंडूंमध्ये केल्या होत्या. यानंतर मात्र ग्रीनने आपले कौशल्य दाखवत पुढच्या 16 चेंडूत 33 धावा ठोकल्या. ग्रीनने आपल्या संपूर्ण खेळीत 8 चौकार व 4 गगनचुंबी षटकार ठोकले.
ग्रीनच्या या शानदार खेळीने ऑस्ट्रेलियाला 406 धावांची भक्कम आघाडी मिळाली आहे. त्याला बुमराहने बाद केल्यानंतर ऑस्ट्रेलियाने 6 बाद 312 धावांवर डाव घोषित केला आणि भारताला पहिल्या डावातील 94 धावांच्या आघाडीसह 407 धावांचे आव्हान दिले.
Cameron Green:
First 51 runs: 116 balls
Final 33 runs: 16 balls#AUSvIND pic.twitter.com/Oijs6NM8iO— cricket.com.au (@cricketcomau) January 10, 2021
दरम्यान सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ संपला असून भारताने दुसऱ्या डावात 2 गडी गमावत 98 धावा केल्या आहेत. भारताकडून रोहित शर्माने शानदार 51 धावांची खेळी केली, मात्र दिवसाचा खेळ संपण्यासाठी थोडाच वेळ बाकी असताना तो बाद झाला. भारतीय संघाला विजयासाठी अजूनही 309 धावांची आवश्यकता आहे. सामन्याच्या पाचव्या दिवशी भारतीय कर्णधार अजिंक्य राहणे व चेतेश्वर पुजारावर सामना वाचविण्याचे मोठी जबाबदारी असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
स्मिथला सर्वाधिक वेळा बाद करणाऱ्या भारतीयांच्या यादीत ‘हा’ गोलंदाज अव्वल
वर्णद्वेषी टिप्पणी करणार्या प्रेक्षकांवर आजीवन बंदी घालावी, माजी खेळाडूने केली मागणी
ही तर हद्द झाली! भारतीय खेळाडूंवर झालेल्या वर्णद्वेषी टीकेबद्दल ‘कर्णधार’ विराट संतापला






