भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील अखेरचा सामना रविवारी (25 सप्टेंबर) हैदराबाद येथील राजीव गांधी स्टेडियमवर सुरू झाला. मालिकेतील या निर्णायक सामन्यात नाणेफेकीचा कौल भारतीय संघाच्या बाजूने राहिला. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीची संधी मिळालेल्या ऑस्ट्रेलियाला कर्णधार ऍरॉन फिंच व युवा कॅमेरून ग्रीन यांनी वादळी सुरुवात दिली. ग्रीनने भारतीय गोलंदाजांची धुलाई करत अवघ्या 19 चेंडूंमध्ये अर्धशतक साजरे केले.
Cameron Green's brilliant form continues ????#INDvAUS | Scorecard: https://t.co/n1SfDGTNzu pic.twitter.com/CdlTJ6scBO
— ICC (@ICC) September 25, 2022
मोहली येथे झालेल्या पहिल्या सामन्यात वेगवान खेळी करणाऱ्या कॅमेरुन ग्रीनने या सामन्यातही पहिल्या षटकापासून फटकेबाजीला सुरुवात केली. त्याने दुसऱ्याच चेंडूवर भुवनेश्वर कुमार याला षटकार ठोकला. त्यानंतरही एक चौकार ठोकत त्याने आपले इरादे दाखवले. डावातील तिसऱ्या षटकात भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला त्याने दोन षटकार मारत संघाला सामन्यात पुढे केले. फिंच व ग्रीन यांनी पहिल्या गड्यासाठी 3.3 षटकात 44 धावा केल्या. फिंच बाद झाल्यानंतरही ग्रीनने आपले आक्रमण सुरू ठेवले. त्याने अवघ्या 19 चेंडूंमध्ये 7 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने अर्धशतक साजरे केले. त्यानंतर मात्र तो फार काळ टिकला नाही. 21 चेंडूंमध्ये 52 धावा करत तो बाद झाला. भुवनेश्वर कुमार याने त्याचा बळी मिळवला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कुलदीपच्या जाळ्यात अडकला न्यूझीलंड संघ, फिरकी गोलंदाजासमोर फलंदाजांचे लोटांगण
कॅप्टन अजिंक्य रहाणेचा संघ बनला चॅम्पियन! ठरली दुलीप ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वात ‘यशस्वी’ टीम
तिसऱ्या टी20साठी रिषभ पंतचा पत्ता कट? जाणून घ्या कारण आणि भारताची संभावित प्लेईंग 11






