ऑस्ट्रेलियाच्या देशांतर्गत क्रिकेटमधील मार्श कप स्पर्धेत क्विंसलॅंड बुल्स आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये सोमवारी (१५ नोव्हेंबर) सामना पार पडला. या सामन्यातदरम्यान जिम्मी पीयरसन या फलंदाजाला दुखापत झाली आहे. या सामन्यात वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघाचा अष्टपैलू खेळाडू कॅमरून ग्रीनने गोलंदाजी करताना एक जबरदस्त बाउंसर टाकला, जो थेट पीयरसनला जाऊन लागला. त्याला हा चेंडू खूप जोरात लागला असला तरी काही गंभीर दुखापत झालेली नाही.
सामन्यादरम्यान क्विंसलँड बुल्सच्या डावाच्या २८ व्या षटकात अष्टपैलू कॅमरून ग्रीन गोलंदाजी करत होता. त्याच्या गोलंदाजीदरम्यान त्याने एक जबरदस्त बाउंसर टाकला, ज्याचा फलंदाजाला अंदाज लागला नाही आणि तो चेंडू थेट त्याच्या हेलमेटवर जाऊन लागला. हा चेंडू फलंदाजी करणाऱ्या पीयरसनच्या हेलमेटवर लागल्यानंतर हेलमेट जवळपास दोन मीटर अंतरावर जाऊन पडले. त्यानंतर पीयरसलची कन्कशन चाचणी करण्यात आली. सुदैवाने या चाचणीत काही गंभीर दुखापत समोर आली नाही. सोशल मीडियावर सध्या या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
व्हिडिओत दिसत आहे की, पीयरलनला चेंडू लागल्यानंतर ग्रीन त्याच्याकडे धावत येतो आणि त्याची माफी मागतो. तसेच नॉन स्ट्राईलला उभा असलेला फलंदाज जो बर्न्सही त्याच्याकडे धावत जाऊन त्याची चौकशी करतो. जेव्हा ही घटना घडली, त्यावेळी पीयरसन १२ धावांसह मैदानात खेळत होता. असे असले तरी, चेंडू लागल्याच्यानंतर त्याने त्याच्या संघासाठी अर्धशतकी खेळी केली, पण तरीही त्याच क्विसलँड संघ सामन्यात पराभूत झाला.
Ouch! Vicious short ball from Cameron Green. Thankfully Jimmy Peirson was OK and went on to make 62 off 50 balls #MarshCup pic.twitter.com/yEJKoTAPtw
— cricket.com.au (@cricketcomau) November 15, 2021
दरम्यान, वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने या सामन्यात प्रथम फलंदाजी केली आणि ३ विकेट्सच्या नुकसानावर ३६१ धावा केल्या. यामध्ये कॅमरून बॅकरॉफ्टने १०४ चेंडूत नाबाद १२४ धावा केल्या. त्याव्यतिरिक्त सलामीवीर जोशुआ फिलिपने ४९ चेंडूत ४५ धावा केल्या. त्यावतिरिक्त एश्टन टर्नरने ४१ चेंडूत ७१ धावांची नाबाद खेळी केली.
प्रत्युत्तरात क्वींसलांड संघ २९१ धावांचा टप्पा गाठू शकला. परिणामी संघाला पराभवाचा सामना करावा लागला. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने हा सामना ७० धावांनी जिंकला.
महत्वाच्या बातम्या-
न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीत ‘हे’ ३ भारतीय खेळाडू भरुन काढतील सलामीवीर रोहित शर्माची कमतरता
भारत-न्यूझीलंड संघ टी२० मालिकेसाठी सज्ज; ‘अशी’ राहिलीये दोन्ही संघांची आमने-सामने कामगिरी
‘ही २००७ ची गोष्ट आहे…’, रोहितने द्रविडच्या नेतृत्त्वाखाली केलेल्या पदार्पणाच्या आठवणींना दिला उजाळा