ऑस्ट्रेलियाचा युवा अष्टपैलू कॅमरून ग्रीन याने शुक्रवारी (10 मार्च) कारकिर्दीतील पहिले कसोटी शतक ठोकले. ग्रीनेने 143 चेंडू खेळून या 100 धावा साकारल्या. बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील हा चौथा आणि शेवटचा सामना असून गुरुवारी (9 मार्च) या सामन्याला सुरुवात झाली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियन संघाचे मारडे सध्या भारतापेक्षा जड दिसते.
Maiden Test hundred for Cameron Green 🔥#WTC23 | #INDvAUS | 📝 https://t.co/VJoLfVSeIF pic.twitter.com/vQG3KkLFP6
— ICC (@ICC) March 10, 2023
ऑस्ट्रेलियाचा 23 वर्षीय अष्टपैलू कॅमरून ग्रीन (Cameron Green) गुरुवारी त्याच्या कारकिर्दीतील 20वा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. तत्पूर्वी 19 कसोटी सामन्यांमध्ये ग्रीनने 6 अर्धशतके केली होती, पण त्याला यापूर्वी एकही कसोटी शतक करता आले नव्हते. शुक्रवारी अखेर कसोटी शतकाची ग्रीनची प्रतिक्षा संपली. ग्रीनने 16 चौकारांच्या मदतीने हे शतक पूर्ण केले. ग्रीनच्या या शतकानंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 4 बाद 355 धावा होती. ग्रीनने या सामन्यात एकूण 114 धावा करून यष्टीरक्षक केएस भरत याच्या हातात विकेट गमावली. फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने त्याला तंबूत धाडले. ग्रीनने विकेट गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 5 बाद 378 धावा होती.
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीच विचार केला, तर पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने 4 बाद 255 धावा केल्या. सलामीवीर उस्मान ख्वाजा आणि कॅमरून ग्रीन यांनी पहिल्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी अनुक्रमे नाबाद 104 आणि 49 धावा करून खेळपट्टीवर काय होते. दुसऱ्या दिवशी या दोघांनीची भारतीय गोलंदाजांचा घाम काढला. ऑस्ट्रेलियाने गमावलेल्या पहिल्या पाच विकेट्समध्ये मोहम्मद शमी आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतल्या. तर रविंद्र जडेजाला एक विकेट मिळाली.
(Cameron Green scored his maiden Test century in India)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पॅट कमिन्सवर कोसळला दुःखाचा डोंगर! आई मारियाचे निधन, ऑस्ट्रेलियन संघाकडून मिळाली श्रद्धांजली
‘भारतीय संघ याठिकाणी कमी पडला…’, अहमदाबाद कसोटीदरम्यान गावसकरांचे मोठे वक्तव्य