---Advertisement---

…तर एमएस धोनीवरही लागणार आयपीएल लिलावात बोली

On: बुधवार, नोव्हेंबर 27, 2019 3:13 PM
---Advertisement---

भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीच्या भविष्याबद्दल मागील अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. नुकतेच भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी स्पष्ट केले होते की धोनीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अद्याप संपलेली नाही. तो आयपीएलमध्ये कसा खेळेल हे पहावे लागेल, असेही ते म्हणाले होते.

यावरुन धोनी आयपीएल 2020मध्ये खेळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे धोनी आणि चेन्नई सुपर किंग्सच्या(सीएसके) चाहत्यांना ही खूशखबर मिळाली आहे.

मात्र धोनी 2021 च्या आयपीएलआधी होणाऱ्या खेळाडूंच्या लिलावात उतरण्याची शक्यता असल्याचे एका सुत्राने माहिती दिली आहे.

“2021 च्या आयपीएलपूर्वी मोठा लिलाव होईल आणि धोनीने आम्हाला सांगितले आहे की तो आयपीएलमध्ये खेळणार आहे. त्यामुळे तो लवकरच टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, ‘असे टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार चेन्नई सुपर किंग्सच्या एका सुत्राने सांगितले.

“धोनी म्हणाला की मी पुन्हा 2021च्या लिलावात जाऊ शकतो. यामुळे सीएसकेला राईट-टू-मॅच कार्ड वापरण्याचा पर्याय मिळेल. त्यामुळे सीएसके कदाचित त्याला कमी किंमतीत परत संघात घेऊ शकेल. धोनी सीएसकेसाठी पैशांचा त्याग करण्यास तयार आहे”, असेही या सुत्राने सांगितले.

तसेच सुत्राने पुढे सांगितले की ‘आम्हाला माहित आहे धोनी आमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे. आम्हाला त्याला पुन्हा लिलावात जाऊ द्यायचे नाही.’

धोनी आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्सचा 2008 पासून भाग आहे. तसेच चेन्नईने आयपीएलमध्ये खेळलेल्या सर्व मोसमात धोनीने संघाचे नेतृत्व केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नईने आयपीएलची 3 विजेतीपदेही मिळवली आहेत.

शास्त्री धोनीबद्दल म्हणाले…

तसेच धोनीच्या भविष्याबद्दल मंगळवारी बोलताना शास्त्री म्हणाले होते की ‘तो खेळायला कधी सुरुवात करतो आणि आयपीएल दरम्यान तो कसा खेळतो यावर सर्व अवलंबून आहे. आयपीएल ही एक मोठी क्रिकेट लीग असेल. कारण ती शेवटची स्पर्धा (टी20 विश्वचषकाआधी) असू शकते, ज्यानंतर भारताच्या अंतिम 15 खेळाडूंची निवड (टी20 विश्वचषकासाठी) केली जाऊ शकते.’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---