---Advertisement---

IPL 2025; कृणाल पांड्या होणार आरसीबीचा कर्णधार?

On: सोमवार, डिसेंबर 9, 2024 11:11 PM
krunal Pandya
---Advertisement---

आयपीएलच्या (IPL) 18व्या हंगामासाठी झालेल्या मेगा लिलावाचा (Mega Auction) चाहत्यांनी मनापासून आनंद लुटला. या लिलावात एकूण 182 खेळाडू विकले गेले. यावेळी अनेक खेळाडू आपल्या जुन्या फ्रँचायझींविरूद्ध खेळताना दिसणार आहेत. यामध्ये ‘कृणाला पांड्या’चेही (Krunal Pandya) नाव आहे. पांड्या आता आरसीबीचा भाग झाला आहे. याआधी तो शेवटच्या 3 हंगामात लखनऊ सुपर जायंट्स (LSG) संघाचा भाग होता.

दरम्यान, आरसीबीच्या एका पोस्टने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. ज्यानंतर कृणाल आयपीएल 2025 मध्ये संघाच्या कर्णधारपदी असणार की नाही? अशी अटकळ बांधली जात आहे.

वास्तविक, आरसीबीने त्यांचा कर्णधार फाफ डू प्लेसिसला (Faf Du Plessis) मेगा लिलावापूर्वी कायम ठेवले नाही आणि लिलावातही त्याला खरेदी करण्यात रस दाखवला नाही. अशा परिस्थितीत आयपीएलच्या 18व्या हंगामासाठी आरसीबीला कर्णधाराची गरज आहे. फ्रँचायझीने त्याचे प्री-सीझन कॅम्प बेंगळुरू येथे आयोजित केले आहे. त्यामध्ये कृणाल पांड्याही सामील झाला आहे.

सोमवारी (9 नोव्हेंबर) आरसीबीने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये कृणाल पांड्या आरसीबीच्या जर्सीत दिसत आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “टॉप इथे आला आहे. पांड्याला आभा आहे, पण तुम्हाला ते आधीच माहीत आहे.” आरसीबीच्या या पोस्टवर प्रचंड प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. एका चाहत्याने लिहिले की, “पांड्याला कर्णधार बनवा.” दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, “कॅप्टन कृणाल पंड्या.”

मीडिया रिपोर्ट्सनुसार, विराट कोहली (Virat Kohli) आयपीएलच्या आगामी हंगामात पुन्हा एकदा आरसीबीचे नेतृत्व करताना दिसू शकतो. आयपीएल 2021 नंतर त्याने कर्णधारपद सोडले. तो संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू आहे. त्यामुळेच फ्रँचायझी त्याला पुन्हा एकदा ही महत्त्वाची जबाबदारी देऊ शकते.

महत्त्वाच्या बातम्या-

“त्याला स्वत:ला सिद्ध करण्याची गरज नाही” माजी दिग्गजाचे रोहितबद्दल मोठे वक्तव्य!
तिसऱ्या कसोटीत भारताचे वाढणार टेन्शन? ऑस्ट्रेलियाच्या स्टार गोलंदाजाचे होणार पुनरागमन
दोन भाऊ इंग्लंडसाठी खेळतात, तिसऱ्या भावानं देश बदलला! या संघाकडून पदार्पण करणार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---