---Advertisement---

श्रेयस अय्यर आशिया कप 2025 मध्ये खेळू शकतो? जाणून घ्या काय सांगतात नियम

On: शनिवार, ऑगस्ट 23, 2025 7:32 PM
---Advertisement---

आशिया कप 2025 ची सुरुवात 9 सप्टेंबरपासून होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 28 सप्टेंबरला खेळला जाईल. आशिया कप 2025 मध्ये 8 देश सहभागी होणार आहेत. बहुतांश देशांनी आपापले संघ जाहीर केले आहेत. भारतीय संघानेदेखील आशिया कपसाठी टीम जाहीर केली आहे, ज्यामध्ये श्रेयस अय्यरला संधी मिळालेली नाही. अय्यरला संघात न निवडल्याबाबत भारतातील अनेक माजी खेळाडूंनी आपली मते व्यक्त केली आहेत. मात्र आशिया कपच्या नियमांनुसार एखादा खेळाडू दुखापतीमुळे बाहेर पडल्यास, त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूला कधीही संघात घेतले जाऊ शकते. त्यामुळे अय्यरची एंट्री अजूनही भारतीय संघात होऊ शकते.

आशिया कपसाठी भारताचा संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हर्षित राणा, रिंकू सिंह.

स्टँडबाय खेळाडू : यशस्वी जयस्वाल, प्रसिद्ध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर, रियान पराग आणि ध्रुव जुरेल

सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आशिया कप 2025 खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. सूर्या पहिल्यांदाच पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघाची कर्णधाराची धुरा सांभाळणार आहेत. यापूर्वी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स लीग 2025 मध्ये इंडिया चॅम्पियन्सच्या खेळाडूंनी खेळण्यास नकार दिला होता. या लीगच्या उपांत्य सामन्यातही भारत आणि पाकिस्तान चॅम्पियन्स यांच्यातील सामना रद्द करण्यात आला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---