पुढिल वर्षी मे महिन्यात आयसीसीच्या वनडे विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. क्रिकेटमधील या मोठ्या स्पर्धेसाठी सर्वच संघ तयारीला लागले आहेत. भारतीय संघही वनडे मालिकेतून विश्वचषकासाठी संघबांधणीची तयारी करत आहे.
भारताने मागील काही काळात चांगल्या कामगिरीमुळे क्रिकेट वर्तुळात त्यांचे वर्चस्व निर्माण केले आहे. त्यामुळे 2019 च्या विश्वचषकासाठी विराट कोहली कर्णधार असलेल्या भारतीय संघाकडून सर्वांचीच मोठी अपेक्षा आहे.
विंडीजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमीनेही विराटची क्षमता भारतीय संघाला 2019 चा विश्वचषक जिंकून देईल असा विश्वास व्यक्त केला आहे.
सॅमी इंडिया टूडेने दिलेल्या वृत्तानुसार म्हणाला की ‘ विश्वचषक चार वर्षांनी खेळला जातो. त्यामुळे विराटने पुढीलवर्षी होणारा विश्वचषक जिंकायला हवा. मी खात्रीशीर सांगू शकत नाही की 2023 च्या विश्वचषकात तो खेळेल की नाही. पण मला खात्री आहे त्याच्यामध्ये भारताला 2019 चा विश्वचषक जिंकून देण्याची क्षमता आहे.’
‘आम्ही सगळे वेगवेगळे कर्णधार आहोत. आम्ही आमच्या नेतृत्वाने वेगवेगळी क्षमता आमच्या संघात आणतो. विराट हा चांगली कामगिरी करत नेतृत्व करतो. त्याच्या कामगिरीत सातत्य आहे.’
‘मी वेगळा आहे. मी प्रेरणा देऊन नेतृत्व केले. माझ्याकडे चांगला संघ होता, ज्यामध्ये मला स्टार होण्याची गरज नव्हती. भारताने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये नेहमीच उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
त्याचबरोबर 2011 चा विश्वचषक विजेता भारतीय कर्णधार एमएस धोनीबद्दल सॅमीने म्हटले आहे की ‘भारताने धोनीच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकला आहे. तो उत्कृष्ट कर्णधार आहे. मी सुद्धा त्याच्याकडून काही गोष्टी शिकलो आहे.’
सॅमी विंडीजकडून शेवटचे 2016 च्या टी20 विश्वचषकात खेळला आहे. तसेच तो जगभरातील अनेक क्रिकेट लीगमध्ये खेळतो. सध्या तो शारजामध्ये सुरु असणाऱ्या टी10 लीगमध्ये नॉर्थन वॉरियर्स संघाकडून खेळत असून या संघाचे नेतृत्वही करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–पृथ्वी शाॅ नसेल तर रोहित शर्माला सलामीला घ्या, पहा कुणी केलीय मागणी
–क्रिकेट क्रिकेटसारखच खेळा, जोशात प्रामाणिकपणा सोडू नका
–हुंदळेवाडीचा वाघ… सिद्धार्थ देसाई
–हॉकी विश्वचषक २०१८: पाॅकेटमनी खर्च करुन तो संघ आलाय भारतात
–शंभर टक्के! तुम्ही असा स्कोअरबोर्ड कधी पाहिला नसेल