आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (१४ नोव्हेंबर) दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडला. न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये पार पडलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने ८ गडी राखून जोरदार विजय मिळवला आणि जेतेपदावर आपले नाव कोरले. या विजयाचा नायक ठरला तो, डेविड वॉर्नर. ज्याने तुफान फटकेबाजी करत ऑस्ट्रेलिया संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. या अप्रतिम कामगिरीनंतर डेविड वॉर्नरची पत्नी कँडीस वॉर्नर हिने एक ट्विट करत सनरायझर्स हैदराबाद संघाची खिल्ली उडविली आहे.
आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी यूएईमध्ये इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेचा दुसरा टप्पा पार पडला. या स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व करत असताना डेविड वॉर्नर पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. ज्यामुळे त्याचे कर्णधारपद काढून घेण्यात आले होते आणि प्लेइंग ईलेव्हनमधून देखील बाहेर केले गेले होते. त्यामुळे त्याला टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया संघात स्थान देण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. परंतु त्याला ऑस्ट्रेलिया संघाकडून खेळण्याची संधी मिळाली आणि संधीचे सोने करत त्याने ऑस्ट्रेलिया संघाला जेतेपद मिळवून दिले. यासह मालिकावीर पुरस्कार देखील पटकावला.
न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात डेविड वॉर्नरने ३८ चेंडूंमध्ये ५३ धावांची खेळी केली. ही खेळी पाहून डेविड वॉर्नरची पत्नी कँडिस वॉर्नरने एक ट्विट केली आहे. तिने, ‘आऊट ऑफ फॉर्म, एक वरिष्ठ आणि संथ! डेविड वॉर्नरचे अभिनंदन’ असे लिहत पुढे हसण्याचे ईमोजी देखील शेअर केले आहेत.
डेविड वॉर्नर फ्लॉप ठरत असल्यामुळे त्याला प्लेइंग ईलेव्हनमधून बाहेर करण्यात आले होते. इतकेच नव्हे तर, अनेकांनी त्याला सनरायझर्स हैदराबाद संघ सोड असा देखील सल्ला दिला होता. त्याने आपल्या या टिकाकारांना जोरदार प्रत्युत्तर देत या स्पर्धेत २८९ धावा चोपल्या आहेत.
Out of form, too old and slow! 😳🤣 congratulations @davidwarner31 pic.twitter.com/Ljf25miQiM
— Candice Warner (@CandiceWarner31) November 14, 2021
Out of form!! 😳🤣 https://t.co/QpfPBEyd4D
— Candice Warner (@CandiceWarner31) November 14, 2021
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत डेविड वॉर्नरच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने या स्पर्धेत अप्रतिम फलंदाजी केली आहे. त्याने अंतिम सामन्यात ५३ धावांची खेळी केली. तर पाकिस्तान संघाविरुद्ध झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याने ४९ धावांची खेळी केली होती. तसेच वेस्ट इंडिज संघाविरुद्ध झालेल्या करो या मरो सामन्यात त्याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत ८९ धावा चोपल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या-
केन विलियम्सनचा मोठा विक्रम! टी२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये ८५ धावा करत विश्वविक्रमाची केली बरोबरी
टी२० विश्वचषकाचे विजेतेपद जिंकणारा ऑस्ट्रेलिया ६ वा संघ; पाहा आजपर्यंतच्या विजेत्यांची संपूर्ण यादी