दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रविवारी (१४ नोव्हेंबर) आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील अंतिम सामना पार पडला. या सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघ आमने सामने होते. या सामन्यात न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघासमोर १७३ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाने ८ गडी राखून विजय मिळवून दिला. यासह जेतेपदावर आपले नाव कोरले. या विजयात संघातील खेळाडूंनी मोलाचे योगदान दिले. परंतु ५ असे खेळाडू होते ज्यांनी विशेष योगदान दिले आणि ऑस्ट्रेलिया संघाला १४ वर्षांनंतर पहिले वहिले जेतेपद मिळवून दिले.
१) डेविड वॉर्नर – टी२० विश्वचषक अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना १७२ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाकडून डेविड वॉर्नरने तुफानी अर्धशतक झळकावले. त्याने अवघ्या ३८ चेंडूंमध्ये ५३ धावांची अप्रतिम खेळी केली. ज्यामध्ये त्याने ३ षटकार मारले होते. या विजयात डेविड वॉर्नरने मोलाचे योगदान दिले.
२) मिचेल मार्श – न्यूझीलंडच्या धावांचा पाठलाग करताना कर्णधार आरोन फिंच अवघ्या ५ धावा करत माघारी परतला होता. त्यावेळी मिचेल मार्शने डेविड वॉर्नरसोबत महत्वपूर्ण भागीदारी केली होती. तसेच मिचेल मार्शने या सामन्यात ५० चेंडूंमध्ये ६ चौकार आणि ४ षटकारांचा मदतीने ७७ धावांची खेळी केली. तसेच डेविड वॉर्नर बाद झाल्यानंतरही त्याने तुफानी फटकेबाजी सुरूच ठेवली होती.
३) ग्लेन मॅक्सवेल – डेविड वॉर्नर आणि आरोन फिंच बाद झाल्यानंतर न्यूझीलंड संघाला वाटू लागले होते की, ते पुनरागमन करू शकतात. परंतु ग्लेन मॅक्सवेलने मिचेल मार्शसोबत महत्वपूर्ण भागीदारी केली. त्याने १८ चेंडूंमध्ये ४ चौकार आणि १ षटकाराच्या साहाय्याने २८ धावांची खेळी केली आणि ऑस्ट्रेलिया संघाला जेतेपद मिळवून दिले.
४) जोश हेजलवूड – या अंतिम सामन्यात जोश हेजलवूडने अप्रतिम गोलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याने आपल्या ४ षटकांच्या स्पेलमध्ये १६ धावा खर्च करत ३ गडी बाद केले. या अप्रतिम गोलंदाजीमुळे न्यूझीलंड संघाचा डाव १७२ धावांवर आटोक्यात आला.
५) ॲडम झांपा – ॲडम झांपाच्या फिरकी गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचे फलंदाज अडचणीत सापडले होते. ॲडम झांपाने या सामन्यात ४ षटक गोलंदाजी केली आणि १ गडी बाद केले होते. त्याने २८ धावांवर फलंदाजी करत असलेल्या मार्टिन गप्टीलला बाद करत माघारी करत धाडले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
पती वॉर्नरला कमी लेखणाऱ्या सनरायझर्स हैदराबादची कँडिसने चांगलीच जिरवली, ‘अशा’ शब्दांत फटकारले
ऑस्ट्रेलियाला विश्वविजेता बनवणाऱ्या वॉर्नरला मालिकावीर निवडल्याने भडकला अख्तर; म्हणाला, ‘आझम खरा…’