बेंगलोर | भारत-अफगानिस्तान यांच्यात गुरूवार दि.14 जूनला सुरू झालेला ऐतिहासिक कसोटी सामना शुक्रवारी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच संपला.
या सामन्यात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने नवख्या अफगानिस्तानला एक डाव आणि 262 धावांनी पराभूत केले.
नवख्या अफगानिस्तानला अनुभवी भारतीय संघाने एका दिवसात दोनदा बाद केले. आपला पहिलाच कसोटी सामना खेळणाऱ्या अफगनिस्तानच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांनसमोर लोटांगन घातले.
भारतीय क्रिकेट मंडळाने अफगानिस्तानला क्रिकेटमधिल त्यांच्या वाटचालीसाठी वेळोवेळी मदत केली आहे. गेल्यावर्षी अफगानिस्तानला आयसीसीने कसोटी क्रिकेटचा दर्जा दिला आहे. त्याचाच भाग म्हणून भारतीय क्रिकेट मंडळाने अफगानिस्तानच्या पहिल्या कसोटी सामन्याचे बेंगलोर येथे आयोजन केले होते.
शुक्रवारी सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भारताचा प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेने अफगानिस्तान संघाविषयी बातचीत केली.
“अफगानिस्तान संघाची मर्यादित षटकांच्या सामन्यातील अलिकडील काळातील कामगिरी पाहता, मला वाटत नव्हते की हा सामना दोन दिवसात संपेल. पण यामध्ये अफगानिस्तान संघाला दोष देणे चूकीचे आहे. हा त्यांचा पहिला कसोटी सामना होेता.” असे रहाणे म्हणाला.
“त्यांना कसोटी क्रिकेटमध्ये सुधारणा करण्यासाठी जास्तीत जास्त कसोटी सामने खेळण्याची गरज आहे. जरी कसोटी सामने नाही तर, नेटमध्ये लाल बॉलवर सराव करून ते कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी परिपक्व होऊ शकतात.” असे भारताचा कसोटी स्पेशेलिस्ट फलंदाज अजिंक्य रहाणे म्हणाला.
तसेच काल सामना संपल्यानंतर विजयी चषकासोबत अफगानिस्तान संघाला फोटो काढण्यासाठी बोलवून अजिंक्य रहाणेने करोडो क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली.
महत्त्वाच्या बातम्या:
–दुसऱ्याच दिवशी पहिली कसोटी खेळणाऱ्या अफगाणिस्तानला भारताचा धोबीपछाड
–फुटबाॅलप्रेमापोटी क्रिकेटर रोहित शर्मा पत्नी रितीकासह थेट रशियाला






