श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात झिम्बाब्वेला 9 विकेट्स राखून दारूण पराभव स्वीकारावा लागला आणि संघाचा कर्णधार सिकंदर रझा यावर अजिबात खूश नाही. त्याने झिम्बाब्वेच्या खेळाडूंवर जोरदार निशाणा साधला आहे. सिकंदर रझा म्हणाला की, या पराभवासाठी संघ कोणतीही सबब करू शकत नाही. रझा याच्या मते, संघाला धैर्याने कसे खेळायचे हे दुसरे कोणीही शिकवू शकत नाही. खेळाडूंनाच जबाबदारी घ्यावी लागेल.
कोलंबोमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात श्रीलंकेने झिम्बाब्वेचा 9 विकेट्स राखून पराभव केला. प्रथम खेळताना झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ 14.1 षटकांत केवळ 82 धावा करू शकला. प्रत्युत्तरात श्रीलंकेने हे लक्ष्य 10.5 षटकांत केवळ एक विकेट गमावून पूर्ण केले. श्रीलंकेचा कर्णधार वनिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) याने अवघ्या 15 धावांत 4 विकेट्स घेतल्या आणि त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. झिम्बाब्वेकडून एकाही फलंदाजाला मोठी खेळी खेळता आली नाही. ब्रायन बेनेट (Brian Bennett) याने 12 चेंडूत 29 धावांची तुफानी खेळी खेळली पण बाकीचे फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले.
संघाच्या या कामगिरीवर सिकंदर रझा (Sikandar Raza) अजिबात खूश दिसत नव्हता. सामन्यानंतर तो म्हणाला, 52 धावांत 6 विकेट्स गमावल्यानंतर आम्ही 82 धावा करून सर्वबाद झालो. यासाठी आम्ही कोणतीही सबब सांगू शकत नाही. तुम्ही एखाद्याला धैर्याने खेळायला शिकवू शकत नाही. आम्ही एकतर खूप चांगले खेळतो किंवा खूप खराब. जेव्हा आपण वाईट खेळतो तेव्हा खूप वाईट खेळतो. चांगली गोष्ट म्हणजे आम्ही क्राऊडचे भरपूर मनोरंजन केले. आम्ही एक क्रिकेटर म्हणून चांगला सराव करत नाही. (Can’t teach you to play with courage Sikandar Raza fumes after defeat against Sri Lanka)
हेही वाचा
‘माझा रामलल्ला विराजमान झाला…’, माजी पाकिस्तानी क्रिकेटरने प्रभू रामांचा फोटो शेअर करत जिंकली लाखो मने
ICC U19 विश्वचषक स्पर्धा; गट, वेळापत्रक आणि सामन्यांचे थेट प्रक्षेपण कधी आणि कुठे होणार? पाहा सर्व एकाच क्लिकवर