---Advertisement---

FIFA World Cup 2026: केप वर्देचा अभेद्य बचाव, स्पेनचा संपूर्ण डाव कोलमडला! स्पर्धेच्या इतिहासात 16 वर्षांनंतर झाले ‘असे’

On: मंगळवार, जून 16, 2026 11:20 AM
---Advertisement---

फिफा विश्वचषक २०२६ मध्ये सोमवारी (१५ जून) या स्पर्धेत पहिल्यांदाच खेळणाऱ्या केप वर्देचा सामना बलाढ्य स्पेनशी झाला. सहा लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या केप वर्देने माजी विश्वविजेत्याचा उत्तमरित्या सामना केला. या सामन्यात जे झाले, ते पाहता सर्वजण थक्क झाले. केप वर्देचा अभेद्य बचाव स्पेनच्या खेळाडूंना भेदता आला नाही आणि त्यांचे सर्व नियोजन कोलमडले. एच गटातील हा सामना गोल शून्य बरोबरीत राहिला.

या सामन्यात केप वर्देने ज्याप्रकारे कामगिरी केली, ती संपूर्ण फुटबॉलविश्वात गाजली. त्यामागचे कारण म्हणजे फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरणारा हा आतापर्यंतचा सर्वात लहान देश आहे. जागतिक क्रमवारीत ६४ व्या क्रमांकावर असलेल्या या संघाचा सामना जेव्हा स्पेनशी झाला, तेव्हा कोणीही अशा निकालाची कल्पना केली नसेल. ५ लाख लोकसंख्या असलेल्या या देशाच्या खेळाडूंनी मैदानावर दाखवलेल्या झुंजार वृत्तीने क्रीडाप्रेमींची मने जिंकली आहेत.

अटलांटाच्या मर्सिडीज-बेंझ स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात स्पेनचे सुरूवातीपासून बॉलवर नियंत्रण दिसले आणि त्यांनी जवळपास ७० टक्के वेळ बॉलचा ताबा कायम ठेवला. त्यांच्या गोल करण्याच्या प्रयत्नासमोर केप वर्देचा ४० वर्षीय अनुभवी गोलकीपर वोजिन्हा (Vozinha) एका भिंतीसारखा उभा राहिला. त्याने पहिल्या हाफमध्ये फेरान टोरेसचे तीन प्रयत्न निष्फळ केले. पूर्ण सामन्यादरम्यान, केप वर्दीच्या बचावफळीने स्पॅनिश आक्रमणाला पूर्णपणे रोखले. त्याने ७ अप्रतिम बचाव केले.

स्पेनने खेळ उंचावण्यासाठी दुसऱ्या हाफच्या शेवटच्या २० मिनिटांत लॅमिन यामाल आणि निको विल्यम्स यांना मैदानात उतरवले. तरीही त्याचा काही परिणाम झाला नाही आणि शेवटी दोन्ही संघांनी पॉइंट्स विभागून घेतले.

या स्पर्धेच्या ५ व्या दिवशी खेळल्या गेलेल्या ४ सामन्यांमध्ये एकूण ८ गोल झाले, मात्र एकाही सामन्याचा निकाल लागला नाही. या स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या केप वर्देने जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या स्पेनला एकही गोल करण्याची संधी दिली नाही. हा सामना ०-० असा ड्रॉ राहिला. दुसरा सामना बेल्जियम आणि इजिप्त यांच्यात खेळला गेला, ज्यामध्ये दोन गोल झाले, मात्र हा सामना १-१ असा बरोबरीत राहिला.

तिसरा सामना ग्रुप एचमधील सौदी अरेबिया आणि उरुग्वे यांच्यात खेळला गेला, जो सुद्धा १-१ असा बरोबरीत राहिला. चौथा सामना ग्रुप जी मधील इराण आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने दोनदा आघाडी घेतली होती, मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. न्यूझीलंडकडून एलिजा जस्टने ७ व्या आणि ५५ व्या मिनिटाला गोल केले. इराणसाठी रामिन रिझाल्यानने ३२ व्या मिनिटाला गोल केला, तर मोहम्मद मोहेबीने ६४ व्या मिनिटाला दुसरा गोल करत सामना २-२ असा बरोबरीत केला.

या स्पर्धेच्या २०२६ च्या आवृत्तीत पहिल्यांदा खेळलेले चारही सामने ड्रॉ राहिले. तसेच स्पर्धेच्या इतिहासात २०१० च्या विश्वचषकात असे शेवटचे दिसले होते. आता १६ वर्षांनंतर, एकाच दिवशी खेळले गेलेले सर्व सामने अनिर्णित राहिले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---