पहिल्या पाच पराभवांनंतर डेविड वॉर्नर याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघ फॉर्ममध्ये आला आहे. कारण, त्यांनी त्यांच्या सहाव्या आणि सातव्या सामन्यात दमदार विजय मिळवला. दिल्लीचा सातवा, तर आयपीएल 2023 स्पर्धेतील 34वा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर खेळण्यात आला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाला दिल्लीकडून 7 धावांनी पराभव पत्करावा लागला. अशाप्रकारे दिल्लीचा हा सलग दुसरा विजय ठरला. मात्र, हंगामातील सलग तिसरा सामना गमावताच हैदराबादचा कर्णधार एडेन मार्करमने प्रतिक्रिया दिली. यावेळी त्याने आपल्याच खेळाडूंवर राग काढला.
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी दिल्लीने निर्धारित 20 षटकात 9 विकेट्स गमावत 144 धावांचा डोंगर उभारला होता. या सोप्या वाटणाऱ्या आव्हानाचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाच्या नाकी नऊ आल्या. त्यांनी 15 षटकांपर्यंत संथ फलंदाजी केली. त्यांना 20 षटकात 6 विकेट्स गमावत फक्त 137 धावाच करता आल्या. त्यामुळे त्यांना पराभवाच्या रूपात भरपाई करावी लागली.
With vital contributions with both bat and ball, @akshar2026 is the Player of the Match as @DelhiCapitals seal a 7-run win over #SRH. 👏 👏
Scorecard ▶️ https://t.co/ia1GLIX1Py#TATAIPL | #SRHvDC pic.twitter.com/9dsT2Po3yn
— IndianPremierLeague (@IPL) April 24, 2023
एडेन मार्करमची प्रतिक्रिया
या पराभवानंतर हैदराबादचा कर्णधार एडेन मार्करम (Aiden Markram) याने मोठी प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, “आम्हाला आणखी चांगले क्रिकेट खेळावे लागेल. आमच्याकडे चांगले फलंदाज आणि गोलंदाज आहेत, पण चांगली कामगिरी करता आली नाही.” पुढे बोलताना मार्करम म्हणाला की, “खेळाडूंनी विचार केला पाहिजे की, चांगली कामगिरी कशाप्रकारे करता येऊ शकते. गोलंदाजांनी परिस्थितीचा चांगला फायदा उचलला आणि चांगली कामगिरी केली.”
सामन्याबद्दल थोडक्यात
हैदराबादकडून फलंदाजी करताना मयंक अगरवाल याने 39 चेंडूत सर्वाधिक 49 धावांची खेळी साकारली. त्याच्याव्यतिरिक्त हेन्रीच क्लासेन याने 19 चेंडूत 31 धावांची खेळी साकारली. स्वत: कर्णधार मार्करम फक्त 3 धावा करून बाद झाला. शेवटी वॉशिंग्टन सुंदर याने काही शानदार शॉट्स खेळत नाबाद 24 धावा करून आशा जिवंत ठेवल्या. मात्र, शेवटच्या षटकात दिल्लीच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली.
Dil aur match, dono jeet liya aaj Mukesh bhai ke yorkers ne 😌🤌#YehHaiNayiDilli #IPL2023 #SRHvDC pic.twitter.com/7hpvEu8lyN
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 24, 2023
शेवटच्या षटकात हैदराबादला विजयासाठी 13 धावांची गरज होती. हे षटक मुकेश कुमार टाकत होता. त्याने शेवटच्या षटकात फक्त 5 धावा खर्च केल्या. त्यामुळे हा सामना दिल्लीने 7 धावांनी जिंकला. दिल्लीच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. कुलदीपने 4 षटकात 22 धावा खर्च करत 1 विकेट घेतली. तसेच, ईशांत शर्मा याने 3 षटकात 18 धावा खर्च करत 1 विकेट घेतली, तर एन्रीच नॉर्किया याने 4 षटकात 33 धावा खर्च करत 2 विकेट्सची कमाई केली. (captain aiden markram got angry on his team after the defeat against delhi capitals)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सनरायझर्सच्या फलंदाजांची हाराकिरी! 145 धावांचा बचाव करताना दिल्लीचा सलग दुसरा विजय
शतक सोडले तर ब्रुक ठरलाय टी20 मध्ये बेकार! 20 धावा करतानाही निघतोय दम