---Advertisement---

‘आज खूप काही बदललं…’, भारताला पराभवाचा झटका दिल्यानंतर यजमानांच्या कर्णधाराचं लक्षवेधी भाष्य

On: बुधवार, डिसेंबर 20, 2023 10:54 AM
Aiden-Markram
---Advertisement---

Aiden Markram Statement: 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने सहजरीत्या नावावर केला होता. मात्र, मंगळवारच्या (दि. 19 डिसेंबर) दुसऱ्या वनडेत भारतीय संघ विजय मिळवण्यात अपयशी ठरला. यजमान दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात 8 विकेट्सने विजय मिळवला. तसेच, मालिकेत 1-1ने बरोबरी साधली. या विजयानंतर कर्णधार एडेन मार्करम याने मोठी प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाला मार्करम?
खरं तर, मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर एडेन मार्करम (Aiden Markram) याने फलंदाजीचा निर्णय घेतला होता, ज्यानंतर त्यांना पराभव पत्करावा लागला. मात्र, दुसऱ्या वनडेत नाणेफेक जिंकल्यानंतर मार्करमने गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि सामनाही जिंकला. हा सामना जिंकताच मार्करमने मोठे विधान केले.

तो म्हणाला, “काही दिवसांपूर्वीच्या तुलनेत हे खूप चांगले आहे. अष्टपैलू प्रदर्शन शानदार आहे. जेव्हा आम्ही आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलो, तेव्हा खेळपट्टी कठीण होती आणि सलामी फलंदाजांचा अशाप्रकारे संघर्ष करणे शानदार होते. हवेने महत्त्वाची भूमिका बजावली. आज खूप काही बदलले आणि शानदार क्षेत्रात गोलंदाजी केली आणि त्याचा निकालही शानदार होता. आम्ही मधळ्या षटकातही चांगल्या क्षेत्रात गोलंदाजी केली आणि शेवटपर्यंत हे कायम ठेवले. चेंडू वळत होता. 300 धावसंख्येची खेळपट्टी नाही, तर 200 धावसंख्येची खेळपट्टी असल्याचा माझा अंदाज होता, पण मी पूर्णपणे चुकीचाही ठरू शकत होतो.”

टोनी डी झोर्झी याच्याविषयी मोठे विधान
सामन्यात शतक ठोकणारा टोनी डी झोर्झी (Tony De Zorzi) याच्याविषयी बोलताना मार्करम म्हणाला की, “ही त्याच्यासाठी मोठी कामगिरी होती. त्याने फक्त काहीच सामने खेळले होते, अशाप्रकारे नाबाद राहणे आणि आव्हानाचा पाठलाग करताना पाहणे ही त्याच्याकडून खास उपलब्धी आहे. आशा आहे की, तो आज रात्री याचा आनंद घेईल आणि ज्याप्रकारे त्याने खेळी खेळली, पूर्ण ड्रेसिंग रूम त्यामुळे आश्चर्यचकित होते.”

पहिल्या वनडेतील पराभवावर भाष्य
पहिल्या सामन्यात 8 विकेट्सने पराभूत होण्याविषयीही मार्करम बोलला. तो म्हणाला, “आम्ही अशाप्रकारचे प्रदर्शन स्वीकारू शकत नाही. ही पहिली गोष्ट आहे, ज्यावर आम्ही लक्ष दिले. हातात बॅट ठेवून आम्ही स्वत:ला निराश केले. आज त्यांनी जे आव्हान दिले, त्याचा पाठलाग करण्याची आमची मानसिकता होती. आजच्या सामन्यानंतर आमचा आत्मविश्वास वाढला आहे.”

या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी भारताने प्रथम फलंदाजी करताना 46.2 षटकात 10 विकेट्स गमावत फक्त 211 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना यजमानांनी डी झोर्झी याच्या 122 चेंडूत नाबाद 119 धावांच्या शतकाच्या आणि रीझा हेंड्रिक्स (Reeza Hendricks) याच्या 52 धावांच्या अर्धशतकाच्या जोरावर 42.3 षटकात 2 विकेट्स गमावत 215 धावा केल्या. आता 21 डिसेंबर रोजी बोलँड पार्कमध्ये होणाऱ्या तिसऱ्या वनडेत कोणता संघ बाजी मारतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (captain aiden markram told how he planned to take revenge from india after losing the first odi read)

हेही वाचा-
दक्षिण आफ्रिकेकडून हारताच कर्णधार राहुलचं सर्वात मोठं विधान; म्हणाला, ‘आमच्या संघाला ते जमलंच नाही…’
अरररर! ‘या’ संघाची झाली मोठी चूक, गोंधळ झाला अन् भलताच खेळाडू घेतला विकत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---