भारत विरुद्ध अफगानिस्तान दरम्यान सुरु असलेल्या तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रविवारी(14 जानेवारी) इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळला गेला. हा सामना भारताने 6 विकेट्सने जिंकला. पहिल्या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करुन सामनावीर ठरलेल्या शिवम दुबेने दुसऱ्या सामन्यातही आपल्या फलंदाजीची छाप सोडली. सामन्यानंतर बोलताना शिवम दुबेने सांगितले की, कर्णधार रोहीत शर्माने त्याच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. परंतु तो स्वतःच त्याच्या एका गोष्टीबद्दल समाधानी नाही.
या सामन्यात शिवमने गगनचुंबी षटकार ठोकत 32 चेंडूत 63 धावा केल्या. यात 5 चौकार आणि 4 षटकारांचा समावेष होता. या आतिषबाजीमुळेच संघाने आपले 174 धावांचे लक्ष अवघ्या 15.4 षटकात गाठले. शिवम पुन्हा एकदा नाबाद राहिला. पहिल्या सामन्यातही शिवमने 60 धावांची नाबाद खेळी केली होती. परंतु तरीही तो दुसऱ्या सामन्यातील कामगीरीबद्दल काहीसा असमाधानी असल्याचे त्याने बोलून दाखवले. (INDvsAFG Captain happy with me but Shivam Dubey’s eye-catching reaction after second T20 win)
सामन्यानंतर बोलताना शिवम म्हणाला, “कर्णधार माझ्या खेळीबद्दल समाधानी आहे. ते म्हणाले की, तू खूप चांगला खेळलास. मी आणि जयस्वाल फटकेबाजी करणारे खेळाडू आहोत. आम्हाला आमचा खेळ माहीती आहे. माझं नियोजन फिरकी गोलंदाजांना लक्ष करण्याच होतं. दोघांनीही सामना लवकर संपवण्याचं ठरवलं होतं.”
पुढे तो म्हणाला, “बऱ्याचशा गोष्टींवर मी काम केलं आहे. स्किल सोबतच टी20 क्रिकेटसाठी मानसिकदृष्ट्या तयार असणं गरजेचं असतं. दबावात कसं खेळायचं, हे ठरवणं की कोणत्या गोलंजांना लक्ष करायच. हे गरजेच नाही की प्रत्येकच चेंडूवर फटका मारावा. मी माझ्या गोलंदाजीवरसुद्धा काम करतोय. पहिल्या सामन्यात मी गोलंदाजी चांगली केली पण आज तसे करता आले नाही. परंतु शेवटी हे टी20 क्रिकेट आहे.”
सामन्यात नेमकं काय झालं?
मालिकेतील दुसऱ्या टी20 सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. अफगानिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद 172 धावा जमवल्या. यामध्ये गुलाबदिन नइबने फक्त 35 चेंडूत 57 धावांची खेळी केली. प्रतिउत्तरात भारताने सुरवातीलाच पुन्हा एकदा रोहित शर्माची विकेट गमावुनही आक्रमक सुरूवात केली. भारताचा सलामी फलंदाज यशस्वी जयस्वालने आपले अर्धशतक पूर्ण करत दहावे षटक संपण्यापुर्वीच संघाची धावसंख्या शंभरीपार नेली. विराट कोहलीच्या 29 धावा आणि नंतर शिवम दुबेने केलेली आतिशी फटकेबाजीने भारताचा विजय निश्चित केला. या विजयासोबतच भारताने मालिकेत 2-0 ने आघाडी मिळवली.
महत्वाच्या बातम्या
IND vs AFG : अफगाणिस्तानविरूद्धच्या विजयानंतर रोहितचं लक्षवेधी विधान; म्हणाला, ‘अशी कामगिरी पाहून…’
ईशान किशनलाबद्दल थेट सीमेपलीकडून आली प्रतिक्रिया, पाकिस्तानी माजी दिग्गजाने केले मोठे विधान