---Advertisement---

कर्णधारावरच भडकला गुजरातचा मॅचविनर राहुल तेवतिया; प्रश्न उपस्थित करत म्हणाला, ‘आधी तूच आम्हाला…’

On: गुरूवार, एप्रिल 28, 2022 8:14 PM
Rahul-Tewatia-And-Hardik-Pandya
---Advertisement---

सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्सचा अष्टपैलू राहुल तेवतियाने शानदार फटकेबाजी करत आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. बुधवारी (दि. २७ एप्रिल) आयपीएल २०२२मधील ४०व्या सामन्यात हैदराबादविरुद्ध तेवतियाने २१ चेंडूंचा सामना करताना नाबाद ४० धावा चोपल्या होत्या. यापूर्वी त्याने पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात शेवटच्या २ चेंडूंवर २ षटकार खेचत संघाला रोमांचक विजय मिळवून दिला होता. अशात त्याने मजेशीर अंदाजात आपला कर्णधार हार्दिक पंड्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

हैदराबादविरुद्ध शानदार विजय मिळवल्यानंतर हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) राशिद खान (Rashid Khan) आणि राहुल तेवतियाशी (Rahul Tewatia) चर्चा केली. राशिदने शेवटच्या षटकात मार्को यान्सेनच्या (Marco Jansen) चेंडूवर ३ षटकार मारले होते. संघाला शेवटच्या षटकात विजयासाठी २२ धावा करायच्या होत्या. या व्हिडिओत पंड्या म्हणाला की, “माझे २ अनमोल रत्न आहेत. मला एक सांगा, तुम्ही दोघेही नेहमी काय करत आहात. आम्हाला विश्वास बसत नाहीये.” यावर राशिद म्हणाला की, “खूप आनंद आहे की, आपण जिंकलो. आम्हाला स्वत:वर विश्वास आहे आणि आम्ही आपल्या शॉटवर फोकस केला. राहुलशी माझी हीच चर्चा झाली आहे.”

तेवतियाचा हार्दिकला प्रश्न
राशिद खान (Rashid Khan) त्याच्या अनोख्या शॉटसाठी ओळखला जातो. पंड्याने त्याला जेव्हा यावर प्रश्न विचारला, तेव्हा तो म्हणाला की, “मी याला स्नेक (साप) शॉट बोलतो. जेव्हा साप एखाद्याला चावतो, तेव्हा तो परत येतो. माझ्या शरीरामुळे मी पूर्ण ताकद लावू शकत नाही. त्यामुळे हा शॉट मारतो.” अशातच पंड्याने तेवतियाला विचारले की, “तू प्रत्येक सामन्यात फलंदाजी करण्यास येतो आणि संपूर्ण सामन्याची दिशा बदलतो.” यावर तेवतिया म्हणाला की, “भावा, आधी तू आम्हाला या परिस्थितीत टाकतो, आणि जेव्हा आम्ही बाहेर पॅड घालून बसतो, तेव्हा तू म्हणतो की, तुझा आमच्यावर विश्वास आहे.”

‘विश्वास तर दाखवणारंच’
पुढे बोलताना तो म्हणाला की, “यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते की, कर्णधार आणि प्रशिक्षक आमच्यावर विश्वास दाखवत आहेत.” यावर पंड्या म्हणाला की, “जेव्हा तुम्ही अशा खेळी कराल, तेव्हा विश्वास तर दाखवणारंच ना.” राहुल तेवतिया पुढे म्हणाला की, “आम्ही सामना संपवत आहोत हे चांगले आहे. आशा आहे की, भविष्यात अशी परिस्थिती आली, तर आपण असा खेळ संपवू.” कर्णधार हार्दिक पंड्या पुढे म्हणाला की, “हल्ली मी तटस्थ होऊन सामना पाहण्यास सुरुवात केली आहे. मी फार आनंदी किंवा दुःखी नाही.”

गुजरात संघाची हंगामातील कामगिरी
गुजरात संघ पहिल्यांदाच आयपीएल २०२२मध्ये खेळताना दिसत आहे. या संघाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्यांनी आतापर्यंत ८ सामने खेळले आहेत. त्यातील ७ सामन्यात विजय, तर १ सामन्यात पराभव पत्करला आहे. गुजरात संघ १४ गुणांसह गुणतालिकेत अव्वलस्थानी विराजमान आहे. संघाने उर्वरित ६ सामन्यांपैकी १ सामना जरी जिंकला, तरी ते प्लेऑफमध्ये स्थान मिळवतील.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

नऊ सामन्यात फक्त १२८ धावा करणाऱ्या विराटला काय सल्ला देशील? रियान परागच्या उत्तराने जिंकली सर्वांची मने

“जर तो धोनीचा चाहता असेल, तर त्याने त्याच्याकडून शिकले पाहिजे”, पंतला भारतीय दिग्गजाचा सल्ला

Video: आयपीएलमध्ये प्रथमच फलंदाजी करत असलेल्या शशांकची घातक बॉलर फर्ग्युसनविरुद्ध षटकारांची हॅट्रिक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---