---Advertisement---

पराभवाचं दु:ख पचवू शकली नाही हरमनप्रीत, दिग्गज खेळाडूच्या गळ्यात पडून रडली ढसाढसा; तुम्हीही व्हाल भावूक

On: शुक्रवार, फेब्रुवारी 24, 2023 11:41 AM
Harmanpreet-Kaur-And-Anjum-Chopra
---Advertisement---

महिला टी20 विश्वचषकाचा 8वा हंगाम सध्या सुरू आहे. 2009पासून सुरू झालेल्या या महिला टी20 विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघाने सर्वाधिक 5 वेळा (2010, 2012, 2014, 2018, 2020) किताब पटकावला आहे. आता आणखी एक विश्वचषक जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यात दाखल झाला आहे. या हंगामातील पहिल्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाला 5 धावांनी पराभूत करत ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्याचे तिकीट मिळवले आहे. त्यामुळे भारताचे किताब जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे.

तब्येत खराब असूनही बॅटमधून तुफान फटकेबाजी करणारी कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) सामन्यानंतर भावनांवर नियंत्रण ठेवू शकली नाही. ती भारताची माजी कर्णधार अंजुम चोप्रा हिच्या गळ्यात पडून ढसाढसा रडू लागली. यादरम्यान प्रत्येक भारतीय सदस्याची हीच स्थिती होती. यादरम्यानचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

हरमनप्रीत कौर आणि अंजुम चोप्रा (Harmanpreet Kaur And Anjum Chopra) यांच्या भावूक क्षणाचा व्हिडिओ आयसीसीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओत दिसते की, ती वरिष्ठ सहकारी आणि स्पर्धेचे समालोचन हिंदीमध्ये करत असलेल्या अंजुम चोप्रा (Anjum Chopra) हिच्या गळ्यात पडून ढसाढसा रडत होती. अंजुमचीही स्थिती अशीच काहीशी होती. ज्यावेळी भारतीय संघाचा पराभव झाला, तेव्हा हरमनला इतके वाईट वाटले की, तिच्या तोंडून शब्दही निघत नव्हते.

https://www.instagram.com/reel/CpBiVy8A6RC/?utm_source=ig_embed&ig_rid=817a2c98-076f-4a03-b9af-aac10a9d0b0a

हरमनप्रीत तिचे डोळे उघडझाक करत अश्रू रोखण्याचा प्रयत्न करत होती. हरमनबाबत विचारले, तेव्हा अंजुम म्हणाली की, “मला फक्त  माझ्या कर्णधाराला दिलासा द्यायचा होता. तिला भावनिक पाठिंबा द्यायचा होता. भावनिक क्षण होता, तिच्यासाठीही आणि माझ्यासाठीही. अनेकदा भारतीय संघ उपांत्य सामन्यात पोहोचला आहे आणि अनेकदा पराभूत झाला आहे. मी पहिल्यांदाच हे पाहिले नाही, यापूर्वीही पाहिले आहे. मी पाहिले की, हरमनने कशाप्रकारे दुखापती आणि तब्येतीचा सामना केला आहे. कदाचित आजचा दिवस असा होता की, ती खेळलीही नसती. मात्र, विश्वचषकातील उपांत्य सामना आहे आणि हरमनप्रीत कौर एक पाऊल मागे टाकणाऱ्या खेळाडूंपैकी नाही, तर एक पाऊल पुढे टाकणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. आज तिने तसेच केले.”

पुढे बोलताना ती म्हणाली की, “कशाप्रकारे तिने स्वत:ला त्या परिस्थिती सांभाळले की, तिने पहिली 20 षटके क्षेत्ररक्षण केले आणि त्यानंतर फलंदाजी करत भारताच्या विजयाच्या आशा जागवल्या. ज्याप्रकारे भारतीय संघ पराभूत झाला, तिथे 5 धावा कमी असत्या, तर भारतासाठी निकाल वेगळाही असू शकला असता.”

सामन्याबाबत बोलायचं झालं, तर ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंग (Meg Lanning) हिने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजी करताना त्यांनी निर्धारित 20 षटकात 4 विकेट्स गमावत 172 धावा केल्या होत्या. आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला निर्धारित 20 षटकात 8 विकेट्स गमावत 167 धावाच करता आल्या. यामध्ये हरमनप्रीतच्या 52 धावांचा समावेश होता. तिच्याव्यतिरिक्त जेमिमा रॉड्रिग्ज हिने 43 धावांचे योगदान दिले. (captain harmanpreet kaur cried bitterly hugging anjum chopra icc shared the video see here)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जर्सी नंबरपासून ते रनआऊटपर्यंत धोनी अन् हरमनमध्ये आहे बरेच साम्य, करिअरबाबतही तसंच होणार का?
सेमीफायनलच्या एक दिवस आधीच बिघडलेली हरमनची तब्येत; कांगारूंचा धाडसाने सामना करत जिंकली सर्वांची मने

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---