आयसीसीनं महिला टी20 विश्वचषकाचे (ICC Women’s T20 World Cup) वेळापत्रक जाहीर केलं आहे. भारतीय महिला संघ टी20 विश्वचषक जिंकण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करेल, पण त्याआधी भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरनं (HarmanPreet Kaur) टी20 विश्वचषक जिंकण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
तत्पूर्वी बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) महिला टी20 विश्वचषक (Women’s T20 World Cup) (3 ते 20 ऑक्टोबर) दरम्यान युएई येथे हलवला आहे. हरमनप्रीतनं ‘पीटीआय व्हिडिओ’शी बोलताना सांगितले की, “जेव्हाही आम्ही अशा मंचावर खेळतो, तेव्हा आम्हाला नेहमीच चांगली कामगिरी करायची असते, आम्ही भूतकाळात नेहमीच चांगली कामगिरी केली आहे आणि आम्हाला आशा आहे की, यावेळी आम्ही अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी होऊ आणि विजेतेपद जिंकू.”
पुढे बोलताना हरमनप्रीत म्हणाली, “एक संघ म्हणून आम्ही आमच्या पराभवातून शिकतो आणि जे अडथळे आम्हाला मागे ठेवत आहेत ते मोडून काढतो, आशा आहे की यावेळी आम्ही विश्वचषकात अधिक सकारात्मक पद्धतीने खेळू शिकू. गोलंदाज एक संघ म्हणून खूप मेहनत घेत आहेत आणि आशा आहे की आम्ही या विश्वचषकात सर्वकाही ठीक करू.”
महत्त्वाच्या बातम्या-
पहिल्यांदाच टी20 विश्वचषक खेळणार ‘या’ भारतीय क्रिकेटपटू, डब्लूपीएलमध्ये केलंय शानदार प्रदर्शन
महादिद्यालयीन विद्यार्थ्यानं फी भरण्यासाठी मागितली रिषभ पंतकडे मदत, पंत म्हणाला…
आयपीएल 2025 मेगा लिलावात मिचेल स्टार्कला मोठ्या किंमतीत विकत घेऊ शकतात ‘या’ 3 फ्रँचायझी!